वृत्तसंस्था
जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. सध्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे. Lashkar-e-Taiba commander Nisar Dar killed
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, कुलगामच्या सिरहामा भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला. स्वत:ला वेढलेले पाहून दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला.
सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले. या कारवाईत लष्कर-ए-तैयबा या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचा स्थानिक दहशतवादी मारला गेला आहे. काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शोध मोहीम अजूनही सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनंतनागच्या काही भागात इंटरनेट बंद करण्यात आल्याची माहिती काश्मीर पोलिसांनी दिली आहे.
पोलीस महानिरीक्षक, आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी सांगितले की, अनंतनागच्या सिरहामा भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा कमांडर निसार डार मारला गेला. तर दुसरीकडे लष्कराचा दहशतवादी अनंतनागमध्ये अडकला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App