राबडी देवी यांचीही काल चौकशी करण्यात आली.
प्रतिनिधी
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडी देवी यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. ६ मार्च २०२३ रोजी सीबीआय अधिकाऱ्यांनी नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्याप्रकरणी राबडी देवी यांची त्यांच्या निवासस्थानी चौकशी केली. आता याच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयची टीम मीसा भारतीच्या घरी पोहोचली आहे. या टीममध्ये सीबीआयच्या ७-८ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याप्रकरणी सीबीआयची टीम लालू प्रसाद यादव यांचीही चौकशी करत आहे. चौकशीची पहिली फेरी संपल्यानंतर अधिकारी पुन्हा एकदा मीसा भारतीच्या घरी पोहोचले आहेत. तर लालू प्रसाद यादव यांच्या चौकशीची दुसरी फेरी सुरू आहे.Land for Jobs Scam Lalu Prasad Yadav is being investigated by CBI
जलील आणि त्याची टोळी म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड – बाळा नांदगावकरांचे टीकास्र!
सीबीआय आणखी काही कागदपत्रे मागू शकते –
अधिकाऱ्यांकडून या तपासाबाबत सांगण्यात आले आहे की, या तपास यंत्रणेकडून कथित घोटाळ्याचा तपास सुरू आहे. पुढील तपासासाठी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात येत आहे. यासोबत त्यांनी तपासाशी संबंधित काही कागदपत्रे मागितले जाऊ शकतात. सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे प्रकरण लालू प्रसाद यांच्या रेल्वे मंत्रीपदाच्या कार्यकाळाशी संबंधित आहे. लालू आणि त्यांच्या कुटुंबीयांवर रेल्वेत नोकरी देण्याच्या बदल्यात जमीन घेतल्याचा आरोप आहे.
तेजस्वी यादव यांनी केली भाजपावर टीका –
बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालूंचे पुत्र तेजस्वी यादव यांनी राबडी देवींच्या चौकशीच्या मुद्द्यावरून भाजपावर निशाणा साधताना म्हटले की, ‘भाजपाच्या राजकीय विरोधकांवर तपास यंत्रणा कारवाई करत आहेत आणि त्या लोकांना मदत करत आहेत जे भाजपच्या समर्थनार्थ आहेत, हे उघड आहे.’ घोटाळ्याच्या प्रश्नावर त्यांनी दावा केला की, तत्कालीन रेल्वेमंत्री लालू यादव हे कोणत्याही घोटाळ्यात सहभागी नव्हते, त्यांच्या वडिलांकडे कोणतेही अधिकार नव्हते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App