लालू यादव, तेजस्वी यादव यांना ‘ED’ने बजावले समन्स!

लालू यादव यांना चौकशीसाठी बोलावण्याची ही पहिलीच वेळ Lalu Yadav Tejashwi Yadav summoned by ED

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचलनालय ‘ईडी’ने बुधवारी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू यादव आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना नोकरीच्या बदल्यात जमीन घेण्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी समन्स पाठवले.

ईडीने याप्रकरणी आरजेडी नेते तेजस्वी यादव यांना शुक्रवारी (२२ डिसेंबर) चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांना बुधवारी (२७ डिसेंबर) या प्रकरणी प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बोलावण्यात आले आहे.

वास्तविक, लालू यादव यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री असताना नोकरीच्या बदल्यात कुटुंबीयांच्या नावावर जमीन घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ईडीने ११ एप्रिल रोजी तेजस्वी यादव यांची सुमारे आठ तास चौकशी केली होती, परंतु लालू यादव यांना बोलावण्याची ही पहिलीच वेळ आहे. लालू यादव कुटुंबाचे कथित निकटवर्तीय अमित कात्याल यांची चौकशी केल्यानंतर ईडीचे हे समन्स आले आहे.

Lalu Yadav Tejashwi Yadav summoned by ED

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात