दोन वरून भाजपला त्रिशतकाकडे नेणाऱ्या नेतृत्वाची शतकाकडे दमदार वाटचाल असेच भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी राजकीय कर्तृत्वाचे आणि आजच्या वाढदिवसाचे वर्णन करावे लागेल. Lal Krishna advani, the man who turned BJP into real nationalists ruling party from opposition DNA syndrome
काल विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाला पराभवाच्या खाईतून आपल्या द्विशतकाच्या बळावर खेचून बाहेर काढले आणि अशक्यप्राय वाटणाऱ्या विजयाच्या शिखरावर नेऊन ठेवले. या ग्लेन मॅक्सवेलची तुलना करायचीच असेल, तर कोणा पावसात भिजून 53 आमदारांच्या आकडा गाठणाऱ्या नेत्याशी नव्हे, तर दोन खासदारांच्या संख्येवरून पक्षाला खासदारांच्या त्रिशतकाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणाऱ्या नेत्याशीच करावी लागेल आणि त्या नेत्याचे नाव लालकृष्ण आडवाणी हे आहे.
1985 मध्ये फक्त दोन खासदार निवडून आणू शकलेल्या भाजपला लालकृष्ण आडवाणींनी चैतन्यदायी नेतृत्व दिले. 1989 मध्ये अडवाणींनी आपल्या नेतृत्व कौशल्याच्या बळावर 86 खासदारांपर्यंत नेऊन ठेवले. म्हणजे खासदारांची संख्या डबल डिजिट केली. पण त्यानंतर 1991 ते 2009 या सर्व लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपची वाटचाल अडवाणींच्या नेतृत्वाखाली त्रिशतकी खासदारांचीच राहिली. या दीर्घ काळात भाजपचा खासदारांच्या आकड्यांमध्ये चढ उतार जरूर झाले, पण भाजपने एकदा का डबल डिजिट मधून बाहेर पडून त्रिशतक गाठले, त्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. भाजपच्या खासदारांचा आकडा त्यानंतर कधीच डबल डिजिट झाला नाही. तो कायम तीन डिजिटमध्येच राहिला, हे आडवाणींचे खरे राजकीय कर्तृत्व आहे.
विजीगिषू वृत्ती
लालकृष्ण आडवाणी यांनी आज 8 नोव्हेंबर 2023 रोजी 96 वर्षात पदार्पण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या अनेक ज्येष्ठांनी आणि श्रेष्ठांनी आडवाणींचे अभिष्टचिंतन करून त्यांच्या देशकार्यातील योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. अडवाणींचे देशकार्य तर अव्वल आहेच, पण ज्या विजीगिषू वृत्तीने आणि चिकाटीने आडवाणींनी आपल्या राजकीय कर्तृत्वाच्या बळावर भाजप सारख्या फक्त दोन खासदार निवडून आणू शकलेल्या पक्षाला खासदारांच्या त्रिशतकापर्यंत नेऊन ठेवणे हे त्यांचे खरे योगदान आहे!!
राजकीय जीवनात कितीही चढ उतार आले, वाटचालीत कितीही खाच खळगे, मोठे खड्डे मार्गात आले तरी आपला मूळ पक्ष बदलायचा नसतो. तो सोडून दुसरा काढायचा नसतो. किंवा सत्तेसाठी पक्षाच्या मूळ ध्येय धोरणांना हरताळ फासून राजकीय भूमिकेत यु टर्न घ्यायचा नसतो. धीमेपणाने पण दमदार वाटचाल करत आपल्या कर्तृत्वावर राजकीय परिस्थिती बदलायची असते, हे लालकृष्ण आडवाणींवर संघाचे संस्कार आहेत. या संस्कारांमधूनच ध्येय पथ पर चल रहे है हे ब्रीद मनाशी बाळगत अडवाणींनी वाटचाल केली आणि भाजपला दोन वरून खासदारांच्या त्रिशतकापर्यंत नेऊन ठेवले. त्यानंतर पक्षाची धुरा त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या समर्थ हातांमध्ये सोपविली.
वटवृक्षाच्या सावलीत जडणघडण
किंबहुना नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, अरुण जेटली या भाजपच्या दिग्गजांची जडणघडणच आडवाणी नावाच्या वटवृक्षाच्या सावलीत झाली. याविषयी हे सगळे नेते कृतज्ञ तर होते आणि आहेतच!!, पण आडवाणींवर अन्याय झाला. आडवाणींना मार्गदर्शक मंडळात घातले, असले उपटसुंभी विश्लेषण करणाऱ्यांना पक्षाच्या वाटचालीत आडवाणींसारख्या नेत्यांनी निरलसपणे दीर्घकाळ योगदान दिले. पक्षाने दीर्घकाळ त्यांचे नेतृत्व स्वीकारले आणि कार्यकर्त्यांची जडणघडण करवून घेतली, हे मात्र दिसत नाही.
मोदी चालवताहेत तो अडवाणींचा समर्थ वारसा
कोणत्याही राजकीय पक्षाच्या वाटचालीत नेतृत्व बदल, धोरण सुधारणा हा राजकीय नैसर्गिक भाग आहे. तसा तो भाजपमध्येही झालाच, पण तो लालकृष्ण आडवाणींच्या नेतृत्वाला बाजूला सारून झाला, असे म्हणणे खुद्द आडवाणींवर आणि नंतरच्या पिढीच्या मोदी – राजनाथ सिंह यांच्यावरही देखील अन्याय करणारे ठरेल. कारण आजच्या भाजपचे नेतृत्व करताना मोदी – राजनाथ सिंह आणि अन्य सर्व नेते हे अडवाणींचाच वारसा अधिक समर्थपणे पुढे नेत आहेत. अडवाणींनी आखून दिलेल्या मार्गात त्यांनी बदल केलेला नाही किंवा पक्षाच्या मूळ राजकीय विचारसरणीशी तडजोड करून ध्येय धोरणांनाही हरताळ फासलेला नाही. उलट भाजपची राजकीय विचार प्रणाली अधिक दृढमूल केली आहे. हा खरा अडवाणींचा वारसा आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App