मागील काही दिवासांपासून विभाकर काँग्रेस नेतृत्वावर नाराज असल्याची माहिती आली आहे समोर
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नातू विभाकर शास्त्री यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते आजच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मागील काही दिवसांपासून ते काँग्रेस नेतृत्वार आणि काँग्रेसच्या कार्यशैलीवर नाराज होते.Lal Bahadur Shastris grandson Vibhakar resigned from Congress and will join BJP
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ट्विट करून त्यांनी राजीनामा जाहीर केला. विभाकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आपण पक्षाच्या प्राधान्य सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. बुधवारी दुपारीच ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
या अगोदर विभाकर शास्त्री यांचा काँग्रेस कार्यकारिणीत (CWC) समावेश करण्यात नव्हता. तेव्हा विभाकर शास्त्री यांनी ट्विट करून 39 सदस्यीय पॅनेलमध्ये स्थान न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी ट्विट करून लिहिले होते की, ‘यावेळेस कदाचित माझ्या तपश्चर्येत काहीतरी कमतरता असेल’. विभाकर शास्त्री यांना काँग्रेस कार्यकारिणीतही स्थान मिळेल अशी आशा होती. मात्र यावेळी त्यांची निराशा झाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App