विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूरमधील छत्रपती राजाराम महाराज विमानतळाला मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनतर्फे उडाण पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे. कोल्हापूर विमानतळाचे डिरेक्टर कमल कुमार कटारिया यांनी हा सन्मान स्वीकारला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, कोल्हापूर सारख्या छोटय़ा विमानतळाला इतका मोठा सन्मान मिळणे हे खूप भाग्यवान आहे. सध्या कोल्हापूर विमानतळावर लिमिटेड इक्विपमेंट्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज आहेत. तरीदेखील हा मोठा राष्ट्रीय पारितोषिक मिळणे ही एक खूप सन्मानजनक गोष्ट आहे. त्यांनी कोल्हापूर येथील पॅसेंजर, स्टाफ, स्टेकहोल्डर्स, मीडिया आणि अॅडमिनिस्ट्रेशन्सचे यावेळी आभार मानले.
Kolhapur Airport honored with Udaan Award by Ministry of Civil Aviation
सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर ज्योतिरादित्य सिंधिया आणि चेअरमन ऑफ एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडिया संजीवकुमार यांच्या हस्ते हा पुरस्कार कटारिया यांना देण्यात आला.
कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी
लवकरच कोल्हापूरमध्ये नव्या फ्लाइट ऑपरेटरची नियुक्ती केली जाणार आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून कोल्हापूर ते मुंबई या रूटवरील फ्लाइट्स वारंवार कॅन्सल होणे यासारख्या बऱ्याच समस्यांमुळे प्रवाशांना बेंगळूरवरुन मुंबईला जावे लागत होते. ही गैरसोय प्रवाशांची थांबावी यासाठी लवकरच नवीन फ्लाईट ऑपरेटर नियुक्त केला जाणार आहे. आणि हा प्रॉब्लेमदेखील सुटणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App