विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली महिला क्रिकेटपटू मिताली राज ठरली. मितालीने शनिवारी आशा व्यक्त केली की तिची कामगिरी देशातील मुलींना प्रेरणा देईल. मितालीने 220 एकदिवसीय आणि 89 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारत देशाचं प्रतिनिधित्व केलं आहे.
भारतीय महिला क्रिकेटच्या या 38 वर्षीय दिग्गज खेळाडूला राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते देशाच्या सर्वोच्च क्रीडा सन्मान खेलरत्नने सन्मानित करण्यात आलं. यावर्षी हा पुरस्कार मिळालेल्या 12 खेळाडूंपैकी मिताली एक आहे.
Truly honoured and grateful to receive the Major Dhyan Chand Khel Ratna Award 🙏 pic.twitter.com/79HZOV9Uox — Mithali Raj (@M_Raj03) November 13, 2021
Truly honoured and grateful to receive the Major Dhyan Chand Khel Ratna Award 🙏 pic.twitter.com/79HZOV9Uox
— Mithali Raj (@M_Raj03) November 13, 2021
हा पुरस्कार मिळाल्यानंतर मितालीने ट्विटरवर लिहिलं की, “खेळातील महिला या बदलाच्या शक्तिशाली उत्प्रेरक असतात आणि जेव्हा त्यांना त्यांच्या पात्रतेचं कौतुक मिळतं, तेव्हा त्या इतर अनेक महिलांना त्यांच्या स्वप्नांचं अनुसरण करण्यास प्रेरित करतात.”
‘मला मनापासून आशा आहे की माझा प्रवास देशभरातील तरुण मुलींना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रेरणा देईल.’
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App