पंजाबमार्गे काश्मिरात तोयबापर्यंत शस्त्रे नेत आहेत खलिस्तानी; गुप्तचर संस्थांची माहिती

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पाकिस्तानने पोसलेली दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाने काश्मीरमध्ये आपल्या अतिरेक्यांपर्यंत घातक शस्त्रे आणि स्फोटके पोहोचवण्याच्या पॅटर्नमध्ये बदल केला आहे. प्रथम येथे पाकिस्तानातून थेट काश्मिरात शस्त्र व स्फोटके पोहोचत होते, आता हे शस्त्र पाकिस्तानातून पंजाबमार्गे काश्मिरात तोयबाच्या अतिरेक्यांपर्यंत पोहोचत आहे.Khalistani carrying arms to Toiba in Kashmir via Punjab; Information from intelligence agencies

दहशतवादी संघटना तोयबाच्या अतिरेक्यांपर्यंत शस्त्र पुरवठ्याचे काम बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित खलिस्तानी अतिरेक्यांद्वारे देशात अन्य दहशतवादी संघटनांच्या अतिरेक्यांच्या स्लीपर सेल नेटवर्कपर्यंत पोहोचण्याबाबत गुप्तचर संस्थांना इनपुट मिळाले आहे.यापूर्वी गुप्तचर संस्थांनी सुरक्षा तपास संस्थांना तोयबा कमांडर जुनैद काश्मीरला येऊन स्लीपर सेल सक्रिय करून कुलगाममध्ये गुप्त बैठक घेतल्याची माहिती दिली होती. अशा खलिस्तानीबाबतची माहिती चिंताजनक ठरली आहे.



बब्बर खालसा इंटरनॅशनलचा वॉन्टेड खलिस्तानी दहशतवादी रमणदीप सिंग ऊर्फ ​​रमण हा पंजाबमधील फिरोजपूरचा रहिवासी आहे. रमणदीप सिंग ऊर्फ ​​रमण याला एनआयएने फरारी घोषित केले असून तो वॉन्टेड दहशतवादी आहे. एनआयएच्या केस फाइल्समध्ये असे दिसून आले आहे की रमण यापूर्वी देशी बनावटीची पिस्तुले आणि इतर अनेक शस्त्रांची देशभरात तस्करी करत असे.

बीएसएफ कारवाईचा परिणाम… काश्मिरात तस्करीचे माध्यम नष्ट

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर, सुरक्षा यंत्रणांनी पाकच्या सीमा भागातून काश्मीरमध्ये घुसखोरी किंवा माल तस्करी करण्याच मार्ग जवळपास संपुष्टात आणले. बीएसएफ आणि इतर सुरक्षा यंत्रणांच्या कठोर भूमिकेचा परिणाम दिसू लागला आहे. गुप्तचर यंत्रणांशी संबंधित सूत्रांनुसार, लष्कर-ए-तोयबाने काश्मीरमध्ये लपलेल्या स्लीपर सेलच्या दहशतवाद्यांना शस्त्रे पुरवण्याचा प्रकार बदलला आहे. दहशतवादी संघटना दहशतवाद्यांना शस्त्रे पुरवण्यासाठी पाक समर्थित दहशतवादी संघटनेची मदत घेत आहे. आता पाकिस्तानातून शस्त्रे थेट काश्मीरमध्ये पोहोचत नाहीत, तर त्यांची पाकिस्तानातून पंजाबमध्ये तस्करी केली जाते व तेथून खलिस्तानी दहशतवादी काश्मिरात शस्त्रे पोहोचवतात.

Khalistani carrying arms to Toiba in Kashmir via Punjab; Information from intelligence agencies

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात