विशेष प्रतिनिधी
तिरुअनंतपूरम : भारतीय लष्कराचे सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्यावर टीका करून केरळच्या सरकारी वकीलाने माणुसकीच सोडलीआहे. केरळ सरकारच्या वकील रेस्मिाथा रामचंद्रन यांनी जनरल रावत हे पवित्र नव्हते असे म्हणत आपल्यातील असंवेदनशिलतेच दर्शन घडविले आहे.Kerala’s public prosecutor criticizes General Bipin Rawat, says he was not holy
एका फेसबुक पोस्टमध्ये, रेस्मिता रामचंद्रन यांनी जनरल बिपिन रावत पवित्र नसण्याची कारणे सांगत त्यांच्यावर अनेक आरोप केले. अत्यंत आक्षेपार्ह पोस्टमध्ये, रामचंद्रन यांनी म्हटले आहे की भारताचे राष्ट्रपती सशस्त्र दलांचे.सर्वोच्च कमांडर आहेत या घटनात्मक संकल्पनेला बगल देत जनरल बिपिन रावत यांची प्रथम संयुक्त संरक्षण प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
जनरल रावत यांनी मेजर लीतुल गोगोई यांना बंडखोरांविरोधी कारवायांसाठी पुरस्कार दिला होता. मेजर गोगाई यांनी इतर दगडफेक करणाºयांना रोखण्यासाठी एका काश्मिरी दगडफेकीला जीपसमोर बांधले होते.जनरल बिपिन रावत यांनी दगडफेक करणाऱ्या काश्मीरींविरुध्द सैन्याला गोळीबाराचे आरोप केले होते.
त्याचबरोबर नागरिकत्व संशोध कायद्याविरुध्द आंदोलन करणाऱ्यांवर विषारी टीका केली होती. मृत्यूने माणूस पवित्र होत नाही असेही रामचंद्रन यांनी म्हटले आ हे. भाजप नेते एस. सुरेश म्हणाले की, रामचंद्रन यांची वक्तव्या देशद्रोही आहेत.
त्यांनी माणुसकीही सोडली आहे. देशाच्या सर्वोच्च सैनिकाचा मृत्यूनंतर अपमान केला आहे. केरळ सरकारने त्यांना उच्च न्यायालयात सरकारी वकील पदावरून हटवावे अशी मागणी एस. सुरेश यांनी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App