विशेष प्रतिनिधी
कोलकत्ता : राष्ट्रीय पातळीवर तृणमूल कॉँग्रेसचा चेहरा बनू पाहत असलेल्या महुआ मोईत्रा यांची वाढती लोकप्रियता आता खुद्द त्यांच्या पक्षाच्या सर्वेसर्वो ममता बॅनर्जी यांनाच सहन होईनासी झाली आहे. याचा राग त्यांनी जाहीर सभेत मोईत्रा यांच्यावर काढला. वाढत्या गटबाजीवरून त्यांना सुनावले.Mamata could not stand the growing popularity of Mahua Moitra, Mamata pulls up Mahua Moitra Moitra in a public meeting due to growing factionalism.
कृष्णानगर येथील जाहीर सभेत ममता यांनी े खासदार महुआ मोइत्रा यांना चांगलेच सुनावत नादिया जिल्ह्यात पक्षातील वाढत्या गटबाजीबद्दल नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, महुआ, मी इथे एक स्पष्ट संदेश देतो. कोण कोणाच्या विरोधात आहे हे बघायची गरज नाही, पण जेव्हा निवडणूक असेल तेव्हा कोण लढवायचे आणि कोण नाही हे पक्ष ठरवेल. त्यामुळे इथे दुमत नसावे.
तीच व्यक्ती कायमस्वरूपी त्याच स्थितीत असेल, अशी कल्पना करण्याचे कारण नाही.एकप्रकारे ममता बॅनर्जी यांनी महुआ मोईत्रा यांनाच इशारा दिला आहे. महुआ मोईत्रा यांची लोकसभेतील भाषणे चांगलीच गाजली होती. गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रभारी असल्याने त्या सध्या राजकारणाच्या केंद्रबिंदू बनल्या आहेत.
त्यामुळेच ममता त्यांच्यावर नाराज असल्याचे मानले जात आहे. तृणमूल कॉँग्रेसमध्ये एकेकाळी मुकुल रॉय यांचा वाढता प्रभाव ममतांना सहन झाला नव्हता. त्यामुळे त्यांनाही पक्षाबाहेर पडावे लागले होते. हिच वेळ महुआ मोईत्रा यांच्यावर येतेय की काय अशी चर्चा सुरू आहे.
ममता यांनी टीएमसीच्या नेतृत्वावर भ्रष्टाचाराचा आरोप करणाºया पोस्टर्सचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या की, पोलिस तपासात हे आरोप खोटे असल्याचे उघड झाले आहे. ही खरी घटना नाही. मी सीआयडी मार्फत त्याची तपासणी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more