वृत्तसंस्था
कोचीन : केरळच्या कोचीन विद्यापीठात सुरू असलेल्या टेक फेस्टदरम्यान चेंगराचेंगरी झाली. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, शनिवारी (25 नोव्हेंबर) कोचीन विद्यापीठात झालेल्या चेंगराचेंगरीत चार विद्यार्थी ठार झाले, तर 60 जण जखमी झाले. मृतांमध्ये 2 मुले आणि 2 मुलींचा समावेश आहे. Kerala’s Cochin University stampede, 4 students dead, 60 injured
विद्यापीठाच्या वार्षिक कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली. जॉर्ज म्हणाल्या- चार जणांना कलामासेरी मेडिकल कॉलेजमध्ये मृतावस्थेत आणण्यात आले होते.
कशी घडली चेंगराचेंगरी?
ओपन एअर स्टेडियममध्ये हा कार्यक्रम सुरू होता. निखिता गांधी यांचे गाणे सुरू झाल्यानंतर गर्दी वाढली, कारण विद्यार्थ्यांव्यतिरिक्त काही बाहेरचे लोकही कॅम्पसमध्ये आले होते. दरम्यान, पाऊस सुरू होताच लोक नजीकच्या सभागृहात पोहोचले, त्यामुळे तेथे मोठी गर्दी झाली आणि चेंगराचेंगरी झाली. जखमींना कलामसेरी मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
इंडियन एक्स्प्रेस या न्यूज वेबसाइटनुसार, जिल्हाधिकारी एनएसके उन्मेश यांनी सांगितले की, जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या मृतांची ओळख पटलेली नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App