वृत्तसंस्था
कोची: केरळमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. संसर्ग आणि रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे केरळ सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी ( ता. ३१ जुलै )आणि रविवारी (ता. १ ऑगस्ट ) संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केला आहे. Kerala to impose complete lockdown on July 31, Aug 1 due to rise in COVID-19 cases
बुधवारी सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये गेल्या २४ तासांमध्ये २२, १२९ नवीन प्रकरणे नोंदली गेली. तर भारतातील एकूण प्रकरणे ४३६५४ नोंद झाली. म्हणजे केरळमध्ये ५० टक्क्यांहून अधिक प्रकरणे आहेत. राष्ट्रीय स्तरावर मंगळवारी सक्रिय रुग्णांची संख्या ३,९९,४३६ आणि केरळमध्ये १,४५,३७१ आहे.
मंगळवारी राष्ट्रीय पातळीवर चाचणीत पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण २.१ टक्के होते तर केरळमध्ये ते १२.३५ टक्के होते. मंगळवारी केरळ विधानसभेत हा मुद्दा समोर आला. तेव्हा ज्येष्ठ आमदार आणि आययूएमएलचे विरोधी पक्ष नेते पी.कुणालिकुट्टी यांनी मुख्यमंत्री विजयन यांच्यावर टीका केली. त्यांना राज्यातील कोरोना स्थितीवरून फटकारले होते. कोरोना प्रकरणांवर दररोज नजर ठेवणाऱ्या समितीच्या निर्णयात काहीतरी गडबड आहे, असा आरोप त्यांनी केला.
हा आरोप फेटाळताना विजयन म्हणाले, विरोधक नेहमीच दोष शोधतात. बर्याच राज्यांत ८० टक्के लोक कोरोनाने त्रस्त असताना केरळमध्ये हे प्रमाण केवळ ४९ टक्के आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App