Kerala CPM youth wing leader : केरळमधील इडुक्की जिल्ह्यात अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. माकपा युवा संघटनेच्या नेत्याला एका 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार आणि हत्येच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. 30 जून रोजी मुलीचा मृतदेह तिच्या राहत्या घरी एका खोलीत लटकलेला आढळला होता. Kerala CPM youth wing leader rapes 6-year-old girl for 3 years; hangs her to death now Arrested
विशेष प्रतिनिधी
इडुक्की : केरळमधील इडुक्की जिल्ह्यात अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. माकपा युवा संघटनेच्या नेत्याला एका 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार आणि हत्येच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. 30 जून रोजी मुलीचा मृतदेह तिच्या राहत्या घरी एका खोलीत लटकलेला आढळला होता.
‘टाईम्स नाऊ’च्या वृत्तानुसार, आरोपी चिमुकलीला मिठाई देण्याच्या आमिषाने तीन वर्षांपासून बलात्कार करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना 30 जून रोजी घडली होती. सुरुवातीला पोलिसांनी घटनेच्या संदर्भात अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र, मुलीच्या शवविच्छेदन अहवालात असे दिसून आले की, तिच्यावर दीर्घ काळापासून लैंगिक अत्याचार केले जात होते. यानंतर पोलिसांना खून झाल्याचा संशय आला आणि तपास त्या दिशेने सुरू झाला.
पोलिसांचा असा संशय आहे की, 30 जून रोजी जेव्हा मुलीवर लैंगिक अत्याचार होत होते तेव्हा ती बेशुद्ध झाली आणि आरोपीला भीती वाटली की तिचा मृत्यू होईल. त्यानंतर त्याने तिला खोलीत टांगले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने चौकशीदरम्यान मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली दिली आहे. माकपच्या युवा नेत्याचे हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य उजेडात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
Kerala CPM youth wing leader rapes 6-year-old girl for 3 years; hangs her to death now Arrested
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App