GST Collection : सरकारचे उत्पन्न घटले, जूनमध्ये जीएसटी संकलन 92,849 कोटी रुपये, 9 महिन्यांत पहिल्यांदाच १ लाख कोटींपेक्षा कमी

GST Collection June 2021 slipped below Rs 1 Lakh Crore mark read details

GST Collection : 9 महिन्यांत पहिल्यांदाच देशातील जीएसटी संकलनाचा आकडा 1 लाख कोटींच्या खाली पोहोचला आहे. जूनमधील जीएसटी संकलन मेमध्ये 1.02 लाख कोटी रुपयांवरून घटून 92,849 कोटी रुपयांवर आले आहे. अर्थ मंत्रालयाने मंगळवारी ही माहिती दिली. यापूर्वी सप्टेंबर 2020 मध्ये जीएसटी संकलन 95,480 कोटी रुपये होते. GST Collection June 2021 slipped below Rs 1 Lakh Crore mark read details


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 9 महिन्यांत पहिल्यांदाच देशातील जीएसटी संकलनाचा आकडा 1 लाख कोटींच्या खाली पोहोचला आहे. जूनमधील जीएसटी संकलन मेमध्ये 1.02 लाख कोटी रुपयांवरून घटून 92,849 कोटी रुपयांवर आले आहे. अर्थ मंत्रालयाने मंगळवारी ही माहिती दिली. यापूर्वी सप्टेंबर 2020 मध्ये जीएसटी संकलन 95,480 कोटी रुपये होते.

जूनमधील सकल जीएसटी महसूल पाहिला तर त्यात केंद्र सरकारचे म्हणजेच सीजीएसटी 16,424 कोटी रुपये, एसजीएसटीचे म्हणजेच राज्याचे 20,397 कोटी रुपयांशिवाय आणि इंटिग्रेटेड म्हणजेच आयजीएसटीचे 49,079 कोटी आणि सेसच्या रूपात 6,949 कोटींचा समावेश आहे. तथापि, सरकारच्या निवेदनानुसार, जूनमधील जीएसटी महसूल मागील वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 2% जास्त आहे.

करदात्यांना दिलासा

जीएसटी संकलनाचा हा आकडा 5 जून ते 5 जुलैदरम्यानचा आहे. यादरम्यान आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत 15 दिवसांपर्यंत वाढविण्यासह अनेक करसंबंधित सवलती देण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त व्याजदरातही कपात झाली आहे. सरकारने रेग्युलर सेटलमेंट महणून जूनमध्ये आयजीएसटीचे 19,286 कोटी रुपयांचा सीजीएसटी आणि 16,939 कोटी रुपयांचा एसजीएसटी सेटल केला.

अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जूनमधील जीएसटी संकलन मेदरम्यान झालेल्या व्यवहाराशी संबंधित आहे. यादरम्यान बहुतेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पूर्ण किंवा आंशिक लॉकडाउन होते. परिणामी, मेमधील ई-वे बिल निर्मितीच्या आकडेवारीत 30% घट झाली. म्हणजेच मे महिन्यात 3.99 कोटी ई-वे बिले तयार करण्यात आली होती, तर एप्रिलमध्ये ती 5.88 कोटी होती.

लॉकडाउन उघडताच व्यवसाय आणि व्यापारात रिकव्हरी

निर्बंधांमधील शिथिलतेनंतर व्यवहारांत वाढ झाली आहे. यासह जूनमध्ये 5.5 कोटी ई-वे बिले तयार झाली. यावरून व्यापार आणि व्यवसाय पुन्हा रुळावर येत असल्याचे दिसते. जर आपण दररोज सरासरी बिल निर्मितीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर 20 जूनपासून सुरू होणार्‍या आठवड्यासाठी ई-वे बिलाचा आकडा 20 लाखांच्या पातळीवर पोहोचत आहे. यापूर्वी एप्रिल 2021 च्या पहिल्या दोन आठवड्यांत हा आकडा दिसला. तर 9 ते 22 मेदरम्यान दररोज सरासरी 12 लाख ई-वे बिले तयार करण्यात आली.

जीएसटी कोण भरतो?

तुम्ही कोणताही व्यवहार केला, तर त्यावर तुम्हाला जीएसटी द्यावा लागतो. त्याचप्रमाणे तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर समोर असलेल्या ग्राहकाला जीएसटी जोडून बिल देत असतात. मग ग्राहक तुम्हाला जीएसटीसह रक्कम अदा करतो. यातील जीएसटीचा व्यापाऱ्यांना पुढील महिन्याच्या 20 तारखेपर्यंत जमा करावा लागतो. देशात जीएसटीचे वेगवेगळे टॅक्स स्लॅब आहेत. यानुसार वेगवेगळ्या वस्तूंवर वेगवेगळा जीएसटी लागू होतो.

GST Collection June 2021 slipped below Rs 1 Lakh Crore mark read details

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात