Kashmiri Hindu Genocide : काश्मिरी हिंदूंच्या नरसंहारासाठी दोषी आढळलो तर फाशी द्या; फारूक अब्दुल्लांचा थयथयाट!!

वृत्तसंस्था

श्रीनगर : सध्या “द काश्मीर फाईल्स” या सिनेमा प्रदर्शनावर देशभरात राजकीय वादळ उसळले असताना त्यामध्ये काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराला त्यावेळचे सरकार जबाबदार असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने एका दडवण्यात आलेल्या सत्यावरचा पडदा उठला आहे. Kashmiri Hindu Genocide the kashmir files

फारूक अब्दुल्ला जिम्मेदार

अनेक जण काश्मिरी हिंदूंच्या नरसंहार यासाठी त्या वेळचे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला यांना जिम्मेदार ठरवत आहेत.या मुद्द्यावरून आता स्वतः डॉक्टर फारूक अब्दुल्ला यांनी आपली भूमिका मांडली आहे. काश्मिरी हिंदूंच्या नरसंहारासाठी मी जबाबदार असेन तर मला देशात कुठेही फाशी द्या, असा थयथयाट डॉ. अब्दुल्ला यांनी केला आहे. फक्त काश्मिरी हिंदूच कशाला तर काश्मीर मधल्या शीख आणि मुसलमानांचे काय झाले यासाठी चौकशी आयोग नेमका. त्याची चौकशी होऊ द्या. तटस्थ चौकशी आयोगाच्या चौकशी आणि तपासात जर मी दोषी आढळलो तर मला देशात कुठेही फाशी द्या, असा थयथयाट डॉ. अब्दुल्ला यांनी केला आहे.



– डॉ. अब्दुल्लांनी जिम्मेदारी झटकली

1990 च्या दशकात जे घडले त्याला मी जबाबदार नव्हतो. त्या घटना प्रत्यक्ष पाहणारे आजही हयात आहेत. सध्याचे केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान हे त्यावेळी केंद्रीय मंत्री होते. त्यावेळचे गुप्तचर विभागाचे प्रमुख आणि अरीफ महंमद खान यांना काश्मीर मधली सत्यता माहिती आहे. त्यांनी आता पुढे येऊन बोलले पाहिजे, असे डॉ. फारुख अब्दुल्ला म्हणाले.

– पवारांकडून अब्दुल्लांचे समर्थन

फारुक अब्दुल्लांनी मी दोषी आढळलो तर मला फाशी द्या, असा थयथयाट करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील त्यांच्या समर्थनासाठी बाहेर आले होते. काश्मीर मधल्या हिंदूंच्या नरसंहाराला डॉ. अब्दुल्ला जबाबदार नाहीत. कारण ते त्यावेळी मुख्यमंत्री पदावर नव्हते. त्यांचे सरकार बरखास्त करण्यात आले होते आणि त्यांच्या जागी जगमोहन यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती, असा दावा शरद पवार यांनी केला होता. शरद पवार आणि डॉ. अब्दुल्ला यांचे विशेष संबंध सर्वज्ञात आहेत. पवारांनी अब्दुल्ला यांचे समर्थन केल्यानंतर स्वतः अब्दुल्ला यांनी पुढे येऊन मी दोषी आढळलो तर मला फाशी द्या, असा थयथयाट केला आहे.

Kashmiri Hindu Genocide the kashmir files

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात