कर्तव्यपथावर अवतरले आत्मनिर्भर भारताचे चेतक, कपिध्वज, बजरंग, ऐरावत आणि त्रिपुरांतक!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावरील संचलनात आत्मनिर्भर भारताचे प्रतिबिंब दिसले. भारतीय सैन्य दलांनी विकसित केलेली स्पेशलिस्ट मोबिलिटी वेहिकल्स प्रथमच संचलनात सामील झाली. या सर्व व्हेहिकल्सना भारतीय युद्धशास्त्राशी संबंधित नावे देण्यात आली आहेत. डीआरडीओ, टाटा आणि महिंद्रा या कंपन्यांनी संयुक्तरित्या ही स्पेशालिस्ट मोबिलिटी व्हेहिकल्स विकसित केली आहेत.

मैदानी लढाईत त्याचबरोबर डोंगरी संघर्षात अत्यंत उपयुक्त ठरणारी ही मोबिलिटी स्पेशलिस्ट वेहिकल्स भारतीय सैन्य दलाची वेगवान हालचालीची शक्ती वाढवणार आहेत. कर्तव्यपथावर चेतक, कपिध्वज, बजरंग ऐरावत आणि त्रिपुरांतक ही स्पेशालिस्ट मोबिलिटी व्हेहिकल्स संचलनात सामील झाली.

भारतीय सैन्य दलाच्या उपयुक्ततेसाठी संबंधित व्हेहिकल्स तयार केली असली तरी त्यांचे उत्पादन वाढवून ती विविध देशांच्या गरजेनुसार निर्यात करण्याचा देखील भारतीय सैन्य दलाचा विचार आहे. यातून संरक्षण उत्पादन क्षेत्रात भारताची निर्यात वाढवायला मदत होणार आहे.

 Kartavya Path showcasing India’s advanced military capabilities republic day

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात