विशेष प्रतिनिधी
मुंबई :Sarsanghchalak धर्म म्हणजे केवळ पूजापाठ नवे, ते आचरण आहे. बंधूभाव हाच शाश्वत धर्म असून याचा उल्लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा संविधान मांडताना केला होता. याच बंधूतेच्या आधारे व्यक्ती मोठा झाला तर त्याचे कुटुंब मोठे होईल आणि पर्यायाने समाजही मोठा होईल. त्यामुळे समाजाला आपला देश बनवा आणि यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.Sarsanghchalak
पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नति मंडळ, भिवंडी संचालित पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, भिवंडी शाळेच्या वतीने ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘ध्वजवंदन सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. दरम्यान सरसंघचालकांच्या शुभहस्ते शाळेच्या प्रांगणात सकाळी ८.१५ वाजता राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. सरसंघचालक म्हणाले, “भारत देश पुढे जातोय, प्रगती करतोय, जगात अग्रेसर होत आहे याने सामरिक शक्तीतही वृद्धी होतेय. अण्णासाहेब जाधव यांच्यासारख्या पूर्वजांमुळे, त्यांनी जगलेल्या त्यागपूर्ण जीवनामुळेच या गोष्टी शक्य झाल्या.भारताने जगाचे नेतृत्व करावे यासाठी भारताची प्रतिक्षा सारे विश्व करतेय. भारताला इथवर नेण्यात अनेकांनी आपले समर्पण केले. समर्पण भावनेतूनच विश्वाला मार्ग दाखवायचा आहे. आज भारतीयांनी देशासाठी, समाजासाठी समर्पण भावनेतून कार्य केले पाहिजे, यातूनच भारताला आपण विश्वगुरू स्थानी नेऊ शकू. येणारी पिढी या मार्गाने चालेल आणि भारताला विश्वात गौरवशाली करेल हा विश्वास आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App