विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sharad Pawar राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवारांना कफ झाल्यामुळे बोलताना त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे पुढच्या 4 दिवसांमधले त्यांचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) अधिकृत ट्विटर हँडलच्या हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. पवारांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे ते विश्रांती घेत आहेत. कार्यकर्त्यांनी काळजी करू नये, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले.Sharad Pawar
शरद पवारांची परवाच कोल्हापूर मध्ये पत्रकार परिषद झाली होती. त्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात देखील पवारांचे भाषण झाले होते. त्यावेळी घशाचा त्रास झाल्याचे जाणवत होते. तशा बातम्याही मराठी माध्यमांनी चालवल्या होत्या. घशाचा त्रास होत असतानाही पवारांनी जोरात भाषण केले असे त्या बातम्यांमध्ये माध्यमांनी नमूद केले होते.
परंतु, काल कफाचा त्रास वाढल्याने पवारांचा हिंगोली जिल्ह्याचा दौरा रद्द झाल्याची बातमी आली. त्यापाठोपाठ पुढच्या 4 दिवसांचे कार्यक्रम शरद पवारांनी रद्द केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) अधिकृत ट्विटर हँडलवर या संदर्भात माहिती देण्यात आली. त्याचाच हवाला देऊन एएनआय या वृत्त संस्थेने पवारांचे कार्यक्रम रद्द झाल्याची बातमी दिली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पवार आता विश्रांती घेत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App