क्रिकेटमधील योगदानाबद्दल अश्विन निश्चितच या सन्मानास पात्र होता.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : R Ashwin २०२५ च्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. भारत सरकारने ज्या खेळाडूंना पद्मश्री पुरस्कार दिला आहे, त्यात नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या आर. अश्विनचे नावही समाविष्ट आहे. क्रिकेटमधील योगदानाबद्दल अश्विन निश्चितच या सन्मानास पात्र होता.R Ashwin
आर अश्विन यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. दशकाहून अधिक काळ भारतीय क्रिकेटचा एक मजबूत आधारस्तंभ राहिलेला अश्विन या सन्मानास पात्र आहे. अश्विनने अनेकवेळा केवळ त्याच्या गोलंदाजीनेच नव्हे तर त्याच्या फलंदाजीनेही भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
आर अश्विन भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळला आहे. पण कसोटी क्रिकेटमधील त्यांचे योगदान भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नेहमीच लक्षात ठेवले जाईल. अश्विन निःसंशयपणे उत्तम गोलंदाज आहे पण कसोटी क्रिकेटमध्ये त्याने एका अष्टपैलू खेळाडूप्रमाणे कामगिरी केली आहे आणि आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने भारतात आणि परदेशात भारतासाठी सामने जिंकून दिले आहेत.
अश्विन २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य होता. गेल्या दशकात तो कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा सर्वात मोठा आणि नियमित चेहरा आहे. कसोटी सामन्यांमध्ये त्याचे स्थान एकदिवसीय सामन्यांमध्ये विराट कोहलीइतकेच मानले जाऊ शकते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App