कर्नाटकात नेतृत्व बदल नाही, येडीरुप्पांचे काम चांगले, तेच मुख्यमंत्रीपदी राहणार, भाजपाचे कर्नाटक प्रभारी अरुण सिंग यांनी केले स्पष्ट


कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून बी. एस. येडीरुप्पा हे खूप चांगले काम करत आहेत. त्यामुळे त्यांना अस्थिर करण्याच्या कोणत्याही अफवा पसरवू नयेत,  असे सांगत कर्नाटकाचे भाजपाचे प्रभारी अरुण सिंग यांनी नेतृत्वबदल होणार नाही, हे स्पष्ट केले आहे.Karnataka, Yeddyurappa’s work is good, he will remain as Chief Minister, BJP’s Karnataka in-charge Arun Singh made it clear


विशेष प्रतिनिधी

बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून बी. एस. येडीरुप्पा हे खूप चांगले काम करत आहेत. त्यामुळे त्यांना अस्थिर करण्याच्या कोणत्याही अफवा पसरवू नयेत,  असे सांगत कर्नाटकाचे भाजपाचे प्रभारी अरुण सिंग यांनी नेतृत्वबदल होणार नाही, हे स्पष्ट केले आहे.

पत्रकारांशी बोलताना अरुण सिंग म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीरुप्पा यांचा राजीनामा घ्यावा किंवा नेतृत्वबदल करण्याबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर याची चर्चाही झालेली नाही.येडीरुप्पा आणि त्यांचे संपूर्ण मंत्रीमंडळ कोरोनाच्या काळात खूप चांगले काम करत आहेत. पक्षाची संघटनाही काम करत आहे. त्यामुळे येडीरुप्पा हेच मुख्यमंत्रीपदी कायम रहतील.

भारतीय जनता पक्षाचे कर्नाटक अध्यिक्ष नलीन कुमार  यांनीही येडीरुप्पा यांना बदलण्यात येणार असल्याच्या अफवा असून हे पूर्ण कपोल्पीत असल्याचे म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षातीलच एक गट येडीरुप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात होते.

त्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत होता. येडीरुप्पा यांनी रविवारीच पत्रकारांशी बोलताना आपणच मुख्यमंत्रीपदी राहणार असल्याचे सांगितले होते. पक्षाच्या नेतृत्वाचा आपल्यावर पूर्ण विश्वास असल्याचही त्यांनी सांगितले होते. याबाबत अरुण सिंग म्हणाले, पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून येडीरुप्पा  यांनी पक्षाच्या नेतृत्वाविषयी हा विश्वास व्यक्त केला आहे.

मात्र, कर्नाटकातील भाजपाच्या काही आमदारांसह नेत्यांनी येडीरुप्पा यांच्यावर जाहीर टीका करत नेतृत्वबदलाची मागणी केली होती. या प्रकारची वक्तव्ये कोणीही करू नयेत. ज्यांनी आरोप केले आहेत

त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला असल्याचेही सिंग यांनी सांगितले. ते म्हणाले कोणालाही काही प्रश्न किंवा शंका असतील तर त्यांनी माझ्याशी बोलायला हवे. सार्वजनिकरित्या अशा प्रकारचे आरोप कोणीही करू नयेत.

Karnataka, Yeddyurappa’s work is good, he will remain as Chief Minister, BJP’s Karnataka in-charge Arun Singh made it clear

महत्त्वाच्या बातम्या

 

 

 

 

ReplyReply allForward

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात