Karnataka Election Result : भाजपाशी बंडखोरी जगदीश शेट्टर यांना भोवली; मोठ्या फरकाने झाले पराभूत!

सहावेळा ज्या मतदारसंघात विजयी झाले होते तिथेच झाला पराभव

विशेष प्रतिनिधी

बंगळुरू : भाजपविरोधातील बंडखोरी माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना महागात पडली आहे. हुबळी धारवाड मध्य मतदारसंघातून जगदीश शेट्टर यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला आहे. त्यांना भाजपाच्या महेश टेंगीनकाई यांनी पराभूत केले. Karnataka Election Result  Defeat of Jagdish Shettar who rebelled against BJP

या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त प्रतिष्ठेची जागा माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांची हुबळी धारवाड ही मानली जात होती. कारण, या मतदारसंघातून शेट्टर हे सहा वेळा विजयी झाले होते. मात्र या निवडणुकीत त्यांनी भाजपामधून काँग्रेसमध्ये उडी घेतली होती, मात्र ती उडी फसली आहे.

विशेष म्हणजे लिंगायत समाजाचे मोठे नेते मानले जाणारे शेट्टर यांना त्यांच्याच शिष्याच्या हातून पराभव स्वीकारावा लागला. शेट्टर यांचा पराभव करणारे भाजपाचे महेश टेंगीनकाई हे निवडणूक प्रचारादरम्यान स्वत: त्यांचे शिष्य असल्याचे सांगत होते.

Karnataka Election Result  Defeat of Jagdish Shettar who rebelled against BJP

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात