विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कर्नाटकात काँग्रेस बहुमताच्या आकड्याचा आसपास पोहोचत असताना पक्षात मुख्यमंत्री पदासाठी जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी जोरदार चुरस असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पण या पार्श्वभूमीवर राजधानी नवी दिल्लीच्या काँग्रेस मुख्यालयात लागलेल्या एका पोस्टरने मोठा ट्विस्ट आणला आहे.Karnataka election results; Congress gives credit to mallikarjun kharge for victory
कर्नाटक विजय असे भव्य पोस्टर मुख्यालयात लागले असून त्यावर सर्वात मोठा फोटो काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा लागला आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे त्यावर फोटो लावले आहेत. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या फोटो मागे अजातशत्रू हा शब्द मोठ्या अक्षरात प्रिंट केला आहे. यातून कर्नाटक काँग्रेसच्या विजयाचे श्रेय ना सिद्धरामय्या, ना डी. के. शिवकुमार यांना काँग्रेसने दिले आहे, तर ते श्रेय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे आहे, असेच यातून दाखवून दिले आहे. सोनिया राहुल आणि प्रियंका गांधी यांचा या विजयाला हातभार आहे असे त्यांच्या फोटोच्या आकारावरून सूचित केले आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात राजकीय घमासान सुरू असताना मधल्या मध्ये मल्लिकार्जुन खर्गे हे स्वतःच बाजी मारून जातात का?? किंवा त्यांचा कोणी खास माणूस मुख्यमंत्रीपदावर बसवतात का??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Karnataka election results; Congress gives credit to mallikarjun kharge for victory
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App