Karnataka election : भाजपाने १८९ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत ५२ नवीन नावं

Karnataka elections

कर्नाटकात १० मे रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भाजपाने कर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३ संदर्भात त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. केंद्रीयमंत्री आणि भाजपा नेते धर्मेंद्र प्रधान यांनी १८९ उमेदवारांची यादी जाहीर केली असून, पहिल्या यादीत ५२ नवीन नावे आहेत. Karnataka election BJP announced 189 candidates 52 new names in the first list

यादीत OBC (इतर मागासवर्गीय) मधील ३२, SC (अनुसूचित जाती) मधील ३० आणि ST (अनुसूचित जमाती) मधील १६ उमेदवारांचा समावेश आहे. भाजपाने पहिल्या यादीत ९ डॉक्टर, सेवानिवृत्त IAS, IPS, ३१ पदव्युत्तर आणि ८ महिलांना तिकीट दिले आहे. त्याचबरोबर विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे शिगगावमधून निवडणूक लढवणार आहेत. पक्ष उमेदवारांची दुसरी यादी लवकरच जाहीर करणार आहे.

बसवराज सोमप्पा बोम्मई हे २००८ पासून सलग तीन वेळा कर्नाटकातील शिगगाव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २००८ आणि २०१३ मध्ये ते जलसंपदा आणि सहकार मंत्री होते. बोम्मई यांनी चौथ्या येडियुरप्पा सरकारमध्ये गृह, सहकार, कायदा आणि न्याय, संसदीय कामकाज आणि कर्नाटक विधानमंडळ मंत्री म्हणून काम केले आहे.

१० मे रोजी मतदान, १३ मे रोजी निकाल –

कर्नाटकात १० मे रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याचा निकाल १३ मे रोजी लागणार आहे. कर्नाटकात ५.२१ कोटी मतदार आहेत, जे २२४ विधानसभा जागांवर मतदान करणार आहेत.

Karnataka election BJP announced 189 candidates 52 new names in the first list

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात