बिहारच्या विधानसभा निवडणुकीत जसा प्रशांत किशोरने गांधी आंबेडकरांच्या नावाखाली हिंदूंमध्ये फूट पाडायचा फॉर्म्युला मुस्लिमांना दिलाय, त्याच पद्धतीने कर्नाटकात जातीय सर्वेक्षणातच हिंदूंमध्ये फूट पाडायची आखणी तिथल्या काँग्रेस सरकारने केली असून सामाजिक ऐक्याच्या टक्केवारीची वेगवेगळे तुकडे करून मांडणी केली आहे.
देशात जातनिहाय जनगणना होण्यापूर्वीच कर्नाटक मधल्या काँग्रेस सरकारने राज्यात जातनिहाय सर्वेक्षण करायचा निर्णय घेतला आहे. पण त्यापूर्वीच हिंदू समाजात फूट पाडणारी मागणी पुढे आणण्यात आली आहे. ती म्हणजे वीरशैव लिंगायत समाजाने आपल्याला हिंदू समाजाचा भाग मानून जनगणना करू नये, अशी मागणी केली आहे. वीरशैव लिंगायत हा वेगळा धर्म आहे. तो हिंदू धर्मापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे वीरशैव लिंगायत समाजाला हिंदू धर्मामध्ये समाविष्ट करू नये, अशी मागणी वीरशैव हिंदू समाजाच्या वेगवेगळ्या संघटनांनी चालविली आहे. त्याला कर्नाटक मधल्या काँग्रेस सरकारने वेगळ्या पद्धतीने फूस देणे सुरू केले आहे. त्यासाठी माध्यमांमधून सामाजिक ऐक्याच्या टक्केवारीची वेगवेगळे तुकडे करून मांडणी करण्यात येत आहे.
हिंदू समाजात फूट पाडायची टक्केवारी
उदाहरणच द्यायचे झाले, तर कर्नाटकात आधीच्या जातीनिहाय सर्वेक्षणात अनुसूचित जाती जमातींची लोकसंख्या 18 %, मुस्लिमांची लोकसंख्या 13 %, तर लिंगायत समाजाची लोकसंख्या 11 % होती, अशी मांडणी करणे सुरू आहे. याचा अर्थच अनुसूचित जाती जमाती आणि लिंगायत अशा वेगवेगळ्या लोकसंख्येच्या आकड्यांची टक्केवारी मांडून हिंदू समाजात फूट पाडण्याचे काम सरकार बरोबरच माध्यमांनी देखील सुरू केले आहे. त्याचबरोबर भाजपच्या मतपेढीमध्ये फूट पाडण्याचा हा डाव आहे, अशी मखलाशी देखील माध्यमांनी सुरू ठेवली आहे. पण प्रत्यक्षामध्ये ही हिंदू समाजात फूट पाडण्याची खेळी आहे.
– प्रशांत किशोर यांचा डाव
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक रणनीतीकार “प्रशांत किशोर पांडे” यांनी गांधी + आंबेडकरांच्या नावाखाली हिंदूंमध्ये फूट पाडायचा फॉर्म्युला मुस्लिमांना दिलाय. देशात 80 % हिंदू समाज आहे. 20 % मुस्लिम समाज आहे, पण भाजपला फक्त 40 % हिंदू समाज मतदान करतो. उरलेल्या 40 % हिंदू समाज गांधी + आंबेडकरांना मानतो. त्यामुळे 20 % मुस्लिमांनी गांधी + आंबेडकरांना मानणाऱ्या हिंदू समाजाशी युती करावी. या दोन्ही घटकांनी एकत्र येऊन भाजपचा पराभव करावा, असा सल्ला प्रशांत किशोर यांनी मुस्लिमांना दिलाय. हा देखील हिंदू समाजात फूट पाडायचाच डाव असून तो फक्त गांधी + आंबेडकरांच्या नावाने सुरू केलाय. कर्नाटकात तो जातनिहाय सर्वेक्षणाच्या आधी वेगळ्या मार्गाने पुढे आलाय.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App