Kargil Vijay Diwas : राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानसह चीनला कडक इशारा, म्हणाले ‘गरज पडली तर आम्ही…’

Rajnath singh new

युद्ध हे अणुबॉम्बने नाही तर धैर्याने लढले जाते, असंही म्हटले आहे.

विशेष प्रतिनिधी

लडाख : 24 व्या ‘कारगिल विजय दिवस’ निमित्त, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बुधवारी लडाखचे प्रवेशद्वार असलेल्या द्रास येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचले आहेत. जिथे त्यांनी कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतीस्थळावर पुष्पचक्र अर्पण केले. यासोबतच युद्धात शहीद झालेल्या शूर वीरांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. Kargil Vijay Diwas Rajnath Singhs stern warning to Pakistan and China said If need be we will Cross the LOC

यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सैनिकांना संबोधित करताना सांगितले की, ‘’कारगिल युद्धादरम्यान आम्ही नियंत्रण रेषा (LOC) ओलांडली नव्हती. याचा अर्थ असा नाही की आम्ही LOC ओलांडू शकत नाही. गरज भासल्यास आम्ही भविष्यात LOC देखील ओलांडू. भारत आपल्या राष्ट्रीय हिताच्या रक्षणासाठी कोणतीही तडजोड करणार नाही.’’

कारगिल युद्ध भारतावर लादण्यात आल्याचे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानात जाऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पाकिस्तानने आमचा विश्वासघात केला. त्यानंतर मात्र, भारतीय जवानांनी आपले शौर्य दाखवत विजय मिळवला आणि शत्रूंच्या छातीवर आपल्या देशाचा तिरंगा फडकवला. अशा प्रकारे कारगिल युद्धातून आम्ही संपूर्ण जगाला आमच्या शक्तीचा संदेश दिला.

याचबरोबर राजनाथ सिंह म्हणाले की, जेव्हा जेव्हा आमच्या राष्ट्रहिताचा प्रश्न येतो तेव्हा आमचे सैन्य कोणत्याही किंमतीवर मागे हटणार नाही. लडाख-चीन आणि काश्मीर-पाकिस्तानच्या मुद्द्यावर या दोन देशांप्रती कठोर भूमिका घेत ते म्हणाले की, आमच्यासाठी राष्ट्राचा सन्मान सर्वोपरि आहे. यासाठी आम्ही कोणत्याही थराला जायला सदैव तयार आहोत. आपले सैन्य खूप मजबूत आहे, ज्यात आपल्या देशासाठी काहीही करण्याची हिंमत आहे. आपल्या सैनिकांनीही हे अनेकदा सिद्ध केले आहे. ते म्हणाले की, युद्ध हे अणुबॉम्बने नाही तर धैर्याने लढले जाते. मोदी सरकारने सैनिकांना शत्रूंवर कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. देशाचे सैन्य कोणत्याही प्रकारच्या आव्हानाला तोंड देण्यास सक्षम आहे.

Kargil Vijay Diwas Rajnath Singhs stern warning to Pakistan and China said If need be we will Cross the LOC

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात