‘’कितीही मुलाखती दिल्या तरी बेईमानीचे…’’ आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!

Shelar and Thakrey

‘’भरलेला डालड्याचा डाबा उपयोगाला तरी येतो रिकामा डबा टमरेल ठरतो!’’ असंही शेलार म्हणाले आहेत.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना(ठाकरे गट) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज खासदार संजय राऊत हे मुलाखत घेणार आहेत. या मुलाखतीची जाहीरताबाजीही भरपूर करण्यात आली आहे. आवाज कुणाचा कुटुंबप्रमुखाचा असा मथळा मुलाखतीच्या जाहीरातीला देण्यात आला आहे. एवढच नाहीतर वर्षातील सर्वात मोठी प्रखर मुलाखत असंही या मुलाखतीला ठाकरे गटाकडून संबोधण्यात येत आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीवर भाजपा नेत्यांनी निशाणा साधला आहे. BJP MLA Ashish Shelars criticism of Uddhav Thackerays interview

भाजपा आमदार आशिष शेलार म्हणतात,  ‘’महाराष्ट्राच्या जनमताशी ज्यांनी बेईमानी केली ते इमानदार कसे? कितीही मुलाखती दिल्या तरी बेईमानीचे पुसणार नाहीत आता ते ठसे!’’

याचबरोबर ‘’ ही कसली मुलाखत…ही तर जळजळ, मळमळ आणि अपचनाचे करपट ढेकर स्वतः चा पक्ष, सरकार न सांभाळ्याच्या “कलंका”तून बाहेर पडण्याची धडपड!! भरलेला डालड्याचा डाबा उपयोगाला तरी येतो रिकामा डबा टमरेल ठरतो!’’ असं शेलार म्हणाले आहेत.

याशिवाय, ‘’एक काळ मुलाखतीतून वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे डागायचे ते असायचे काडतुस हल्ली सगळं फडतूस, फडतूस आणि फडतूस!!!’’ असं म्हणत शेलारांनी टीका केली आहे.

तर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंनीही ‘’तेच ते… तेच ते…माकडछाप दंतमंजन, तोच ‘जोडा’ तेच रंजन तीच ‘रडगाणी’ तेच तराणे, ‘बाकी मूर्ख’ तेच शहाणे सकाळपासून रात्रीपर्यंत…तेच ते… तेच ते.’’ असं म्हणत टिप्पणी केली आहे.

या अगोदर’’ लोकं उत्सुक आहेत…मित्र पक्षाला कसा धोका दिला हे ऐकण्यासाठी…मुख्यमंत्री पदी असतानाही अडीच वर्ष घरी असल्याची कहाणी ऐकण्यासाठी…विचारधारेला बाजूला टाकून महत्त्वकांक्षेसाठी सत्ता मिळवण्याची गोष्ट ऐकण्यासाठी…कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करून वाढवलेला पक्ष तुमच्या अहंकरापोटी फुटल्याची कहाणी ऐकण्यासाठी…आणि हे सगळं कसं बरोबर आहे हे सांगण्यासाठी संजय राऊत ना लिहून दिलेल्या प्रश्नांची उत्तरं ऐकण्यासाठी.’’ असं म्हणत केशव उपाध्येंनी टीका केली होती.

BJP MLA Ashish Shelars criticism of Uddhav Thackerays interview

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात