मोदी सरकार विरुद्ध I.N.D.I.A आघाडीच्या अविश्वास प्रस्तावाला केसीआर यांच्य BRS ची साथ!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना संसदेत खेचून आणून चर्चा घडवायला भाग पाडण्यासाठी विरोधी इंडिया आघाडीने आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर I.N.D.I.A आघाडी बाह्य चंद्रशेखर राव यांच्या BRS अर्थात भारत राष्ट्र समितीने साथ दिली आहे. BRS supports KCR’s no confidence motion against I.N.D.I.A alliance against Modi Govt

I.N.D.I.A आघाडीतून काँग्रेस तर्फे खासदार तरुण गोगई यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडला. तसाच प्रस्ताव भारत राष्ट्र समितीचे खासदार नामा नागेश्वर राव यांनीही मांडला. या अविश्वास प्रस्तावामुळे I.N.D.I.A बाह्य आघाडीतील 27 वा पक्ष भारत राष्ट्र समिती काँग्रेसच्या साथीला आला आहे.


‘’जर ‘केसीआर’ अशीच नौटंकी करत राहिले, तर…’’ संजय राऊतांचं विधान!


प्रत्यक्षात तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समिती आणि काँग्रेस यांच्यात उभा राजकीय दावा आहे. पण मोदी सरकार विरुद्धच्या अविश्वास प्रस्तावावर मात्र बीआरएस मने काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तरुण गोगाई यांचा अविश्वास प्रस्ताव स्वीकारून संसदेत लोकसभेत तो मांडायची परवानगी दिली आणि त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांची चर्चा करून अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेला नेमका किती वेळ द्यायचा याचा निर्णय नंतर जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आता लोकसभा अध्यक्ष सर्व पक्ष नेत्यांची चर्चा करून अविश्वास प्रस्तावावरील संपूर्ण चर्चेचा कालावधी निश्चित करतील आणि त्यामध्ये विरोधी तसेच सत्ताधारी गटातील खासदारांच्या विशिष्ट वेळ निश्चित करून सरकारला उत्तर देण्यासाठी विशिष्ट वेळ बहाल करतील. साधारणपणे अविश्वास प्रस्तावावर दोन दिवस चर्चा चालेल आणि त्यांना आणि त्या चर्चेला अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देतील.

पण या अविश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने हिंसाचार ग्रस्त मणिपूर वर चर्चा करायला पंतप्रधान मोदींना भाग पाडल्याचे राजकीय सवाल काँग्रेसला 26 पक्षांच्या I.N.D.I.A बाह्य आघाडीला मिळणार आहे, तसेच 27व्या BRS ची साथ हा देखील चर्चेचा विषय ठरणार आहे.

BRS supports KCR’s no confidence motion against I.N.D.I.A alliance against Modi Govt

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात