हिंसाचारात आतापर्यंत १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला
विशेष प्रतिनिधी
इंफाळ : मणिपूरमधील हिंसाचार अद्याप थांबलेला नाही. आज (बुधवार) कांगपोकपी जिल्ह्यात उपद्रवींनी सुरक्षा दलाच्या दोन बसेस पेटवून दिल्या. सुदैवाने जाळपोळीत कोणतीही जीवित झाली नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मंगळवारी सायंकाळी दिमापूरहून बसेस येत असताना सपोरमिना येथे ही घटना घडली. Violence broke out again in Manipur both the security forces were just fed up
अधिका-यांनी सांगितले की, हिंसाचारात सामील असलेल्या उपद्रवींनी सपोरमिना येथे मणिपूर नोंदणी क्रमांक असलेली बस थांबवली. बस थांबवल्यानंतर, लोकांच्या एका गटाने सांगितले की बसमध्ये इतर समाजातील कोणी आहे का ते तपासू. अधिका-यांनी सांगितले की, जेव्हा त्यांना इतर समाजातील एकही व्यक्ती सापडली नाही, तेव्हा त्यांच्यापैकी काहींनी बस पेटवून दिल्या.
मैतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा अशी अनेक दिवसांपासून मागणी आहे. अनुसूचित जमातीचा दर्जा मिळाल्यानंतरच ते डोंगराळ भागात स्थायिक होऊ शकतात. मैतेई समाजाच्या या मागणीसाठी पहाडी जिल्ह्यांमध्ये ३ मे रोजी काढण्यात आलेल्या ‘आदिवासी एकता मार्च’ दरम्यान हिंसाचार उसळला होता. तेव्हापासून हिंसाचार सुरूच आहे. ताज्या माहितीनुसार, हिंसाचारात आतापर्यंत १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App