कंगना रनौटची गांधीजींवर टीका, त्यांच्या मार्गाने स्वातंत्र्य नव्हे तर भिकच मिळते

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौटने आपल्या स्वातंत्र्य भिक म्हणून मिळाले या वक्तव्याचे समर्थन करताना महात्मा गांधी यांच्यावरच टीका केली आहे. कंगनाने म्हटले आहे की, हे तेच लोक आहेत ज्यांनी आपल्याला शिकवले की, एखाद्याने तुम्हाला थापड लगावली तर त्याच्यासमोर दुसरा गाल पुढे करा आणि या मार्गाने तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल.Kangana Ranaut’s critique of Gandhiji, his way is not freedom but begging

मात्र, या मार्गाने स्वातंत्र्य नाही तर भीक मिळते. तुमचे आदर्श विचारपूर्वक निवडा.देशाला स्वातंत्र्य भिक म्हणून मिळाले आहे असे वक्तव्य कंगनाने केले होते. त्यामुळे देशभरात अनेक एफआयआर दाखल झाल्यानंतरही कंगना रणौत शांत बसलेली नाही.



कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीजवर एक न्यूज कटिंग आणि दोन मोठे संदेश पोस्ट केले आहेत. याद्वारे कंगनाने पुन्हा एकदा स्वातंत्र्य भिक म्हणून मिळाले या विधानावर आपली भूमिका मांडली आहे.

कंगनाने म्हटले आहे की, ज्यांच्याकडे ब्रिटीशांच्या दमनशाहीविरोधात लढण्याचे धैर्य नव्हते आणि जे सत्तेचे भुकेले होते त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना ब्रिटीशांकडे सुपूर्द करण्याचं काम केले.

देशभरात कंगनावरोधात निदर्शने आणि एफआयआरही दाखल करण्यात आले आहेत. या विधानाच्या आधारे कंगनाला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्याची मागणीही अनेकांनी भारत सरकारकडे केली आहे.

Kangana Ranaut’s critique of Gandhiji, his way is not freedom but begging

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात