भारतातील ‘या’ गावात कमला हॅरिसचे आहे माहेर, रस्त्यांवर झळकले पोस्टर्स

निवडणुकीत यश मिळावे म्हणून मंदिरात विशेष पूजा केली जाते आहे


विशेष प्रतिनिधी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पुढील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर आता भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार म्हणून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्या निवडीला बायडेन यांनी पाठिंबा दिला आहे.Kamala Harris has a family connection with this village in India Posters appeared on the streets

कमला हॅरिसचे नाव समोर आल्यानंतर तामिळनाडूच्या थुलसेंद्रपुरम गावात असलेल्या त्यांच्या माहेरच्या घरात आनंदाची लाट पसरली आहे. कमला हॅरिस यांच्या समर्थनार्थ गावात पोस्टर लावण्यात आले असून, त्यांच्या विजयासाठी धर्मशास्त्र मंदिरात विशेष प्रार्थना करण्यात आली आहे.



कमला हॅरिसचे आजोबा पीव्ही गोपालन हे तमिळनाडूच्या तिरुवरूर जिल्ह्यातील मन्नारगुडी येथील थुलसेंद्रपुरम गावचे रहिवासी होते. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कमला हॅरिस यांचे नाव पुढे आले ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. हे पाहता गावाच्या वेशीवर बांधलेल्या मंदिरात कमला हॅरिस साठी पूजा सुरू झाली असून अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवसापर्यंत ही पूजा सुरू राहणार आहे.

मंदिराच्या पुजाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कमला हॅरिस यांनी अनेक वर्षांपूर्वी धर्मशास्त्र मंदिराला देणगी दिली होती. मंदिराच्या भिंतीवर देणगीदारांची यादी आहे, त्यात कमला हॅरिस यांचे नावही लिहिले आहे. कमला हॅरिस या गावात कधीच आल्या नाहीत, मात्र आता राष्ट्रपती झाल्यानंतर त्या एकदा तरी नक्कीच गावात येतील, अशी आशा गावातील लोकांना आहे.

Kamala Harris has a family connection with this village in India Posters appeared on the streets

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात