आधी अजितदादांचे स्वतंत्र करिअर सेटल करण्याची भाषा; आता पवारांना आरक्षण बचाव यात्रेचे निमंत्रण!!; बाळासाहेबांचे चाललेय काय??


नाशिक : आधी अजितदादांचे स्वतंत्र करिअर सेटल करण्याची भाषा आणि आता प्रकाश आंबेडकर यांचे शरद पवार यांना आरक्षण बचाव यात्रेचे निमंत्रण असला प्रकार स्वतः प्रकाश आंबेडकरांनीच केल्यामुळे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचे नेमके चाललेय काय??, असा सवाल तयार झाला आहे. प्रकाश आंबेडकरांना काका – पुतण्यांच्या राजकारणामध्ये आपले नेमके कोणते राजकारण साध्य करून घ्यायचे आहे??, हा तो सवाल आहे. First prakash ambedkar offered ajit pawar to join hands with VBA, now he invites sharad pawar to join save reservation yatra

प्रकाश आंबेडकरांनी काहीच दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण मुद्द्याला विरोध केला होता. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण नकोच, अशी ठाम भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली होती. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या भूमिकेला छेद गेला. त्याच वेळी प्रकाश आंबेडकरांनी अजित पवारांना एक ऑफर दिली होती अजित पवारांनी महायुतीच्या सत्तेमधून बाहेर पडावे. तसेही ते राष्ट्रवादी काँग्रेस घेऊन स्वतंत्रपणे वाटचाल करतच आहेत. आम्ही म्हणजे वंचित बहुजन आघाडी त्यांचे राजकारण महाराष्ट्रात सेटल करून देईल, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले होते.

अर्थात हे वक्तव्य करताना प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्वतःची ताकद किती??, लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला नेमकी किती मते मिळाली होती??, या संदर्भात कुठलेही भाष्य केले नव्हते. पण त्यांनी अजित पवारांना त्यांचे राजकारण महाराष्ट्रात सेटल करून घेण्याची भाषा वापरली होती, हे मात्र निश्चित!! त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण अजित पवारांनी मात्र अजून तरी प्रकाश आंबेडकरांच्या ऑफरला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसलेले नाही.

पण त्या पलीकडे जाऊन प्रकाश आंबेडकर यांनी एक वेगळीच चाल खेळून थेट शरद पवार आणि छगन भुजबळ यांनाच आरक्षण बचाव यात्रेमध्ये सामील होण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यांनी हे निमंत्रण पत्र दोन्ही नेत्यांना पाठविले आहे. प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा 25 जुलै रोजी मुंबईतल्या चैत्यभूमीपासून सुरू होणार आहे. या यात्रेतल्या कुठल्याही टप्प्यात पवार आणि भुजबळ यांनी त्यांच्या सोयीनुसार आपल्याबरोबर सामील व्हावे, असे आंबेडकरांनी त्या निमंत्रण पत्रात म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या या निमंत्रणामुळेच आंबेडकरांना नेमके पुतण्याला बरोबर घ्यायचे आहे की काकांना बरोबर घ्यायचे आहे??, असा सवाल तयार झाला आहे. कारण काका – पुतण्यांचे राजकारण आज तरी रेल्वे रूळासारखे समांतर सुरू आहे. भले दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये “ताटातले वाटीत आणि वाटीतले ताटात” असले राजकारण सुरू असेल, पण त्या राजकारणाचा प्रकाश आंबेडकरांची दुरान्वये देखील संबंध नाही. त्या राजकारणाचा संबंध थेट सत्तेच्या वळचणीशी आहे. आज भाजपची सत्ता आहे, त्यामुळे अजित पवार भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आले आहेत. उद्या पवारांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची सत्ता आली, तर अजितदादांचे सगळे आमदार सहज उठून पवारांच्या सत्तेच्या वळचणीला निघून जातील, हे सांगायला फार मोठ्या ज्योतिषाची गरज नाही.

पण या सगळ्या राजकारणामध्ये प्रकाश आंबेडकर यांचे राजकारण कुठेही “बसत” नाही. या पार्श्वभूमीवरच आधी प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवारांना त्यांचे राजकारण सेटल करून देण्याची ऑफर देणे आणि नंतर थेट शरद पवारांनाच आरक्षण बचाव यात्रेत सामील होण्याचे निमंत्रण देणे यातली विसंगती महाराष्ट्रासमोर आली आहे.

First prakash ambedkar offered ajit pawar to join hands with VBA, now he invites sharad pawar to join save reservation yatra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात