विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या पद्धतीने उपोषणे केल्यानंतर सातत्याने छगन भुजबळ यांना टार्गेट केले. त्यामुळे छगन भुजबळ शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचले होते. तिथे त्यांनी पवारांना मराठा आणि ओबीसी आरक्षणात लक्ष घालायची विनंती केली होती. त्यानंतर शरद पवारांनी सह्याद्री अतिथी गृहावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी गुफ्तगू केले. त्यापाठोपाठाचा प्रकाश आंबेडकरांनी पवारांना आरक्षण बचाव यात्रेत सामील होण्यासाठी पत्र पाठविले आहे. Prakash Ambedkar’s letter to join reservation yatra
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा पुणे दौरा झाला. पुण्यात त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबंधित करताना शरद पवारांना देशातल्या भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार म्हटले होते. ही टीका मनोज जरांगे यांना आवडली नाही. त्यामुळे त्यांनी अमित शाह यांच्यावर ते मराठा समाजाला संपवायला निघाले आहेत, अशी टीका केली. पटेल समाज, गुजर समाज, रजपूत समाज, ठाकूर समाज, दलित समाज यांना भाजप संपवतो आहे, पण हे सगळे समाज एकत्र झाले, तर भाजप संपेल, असा दावा मनोज जरांगे यांनी केला.
एकीकडे मनोज जरांगे यांनी पवारांचा अप्रत्यक्ष बचाव केला असतानाच पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला सह्याद्री अतिथी गृहावर पोहोचले होते. पण तेथे त्यांनी मुख्यमंत्र्यांशी नेमकी काय चर्चा केली??, याबद्दल ते नंतर काही बोलले नाहीत.
पण त्या पाठोपाठ आता प्रकाश आंबेडकरांनी आरक्षण बचाव यात्रेमध्ये सामील होण्यासाठी शरद पवारांना पत्र पाठविले आहे. असेच पत्र त्यांनी छगन भुजबळ यांना देखील पाठविले आहे त्यामुळे पवाराने भुजबळ आता प्रकाश आंबेडकर यांच्या आरक्षण बचाव यात्रेत सामील होतील का नाही??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App