महाआघाडीत सहभागी सर्व पक्ष आपल्या नेत्याला पंतप्रधानपदी मानत आहेत.
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : 2024 च्या निवडणुकीसाठी एकजूट झालेल्या I-N-D-I-A या विरोधी आघाडीमध्ये दुफळी दिसून येत आहे. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये शाब्दिकयुद्ध सुरू आहे. त्याचबरोबर महाआघाडीत सहभागी सर्व पक्ष आपल्या नेत्याला पंतप्रधानपदी मानत आहेत. कालच लखनऊमध्ये अखिलेश यांना ‘भावी पंतप्रधान’ म्हणून संबोधणारे पोस्टर लावण्यात आले होते, ज्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. Kailash Vijayvargiya slams poster of Akhilesh Yadav as future Prime Minister
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी पोस्टरवर खिल्ली उडवत अखिलेश यादव यांनी आधी निवडणूक जिंकावी, मग त्यांनी अशी स्वप्ने पाहावीत, असे म्हटले आहे.
विजयवर्गीय म्हणाले, “प्रथम त्यांनी स्वत: जिंकावं, त्यांच्या पक्षाला जिंकवावं आणि मग पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहावीत.” तसेच, विरोधी आघाडीवर निशाणा साधत ते म्हणाले की, अहंकारी आघाडीतील प्रत्येकजण पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहत आहे, ते स्वप्न पाहतच राहतील आणि पुढील पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदी असतील.
तत्पूर्वी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजान पूनावाला यांनीही याबाबत विरोधकांवर हल्लाबोल केला. I-N-D-I-A आघाडी ही एक अनोखी आघाडी आहे, तिचे देशासाठी कोणतेही ध्येय आणि दृष्टिकोन नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App