मोदी सरकार पडणार असल्याचं भाकीतं खर्गेंनी केलं होतं.
विशेष प्रतिनिधी
तामिळनाडू : तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के अन्नामलाई यांनी शनिवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या त्या विधानावर टीका केली. ज्यात खर्गे यांनी , पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता आणि म्हटले की केंद्रातील आघाडी सरकार चुकून स्थापन झाले आणि ते कधीही पडू शकते. K Annamalai criticizes Congress President Mallikarjun Kharge
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले होते की, एनडीएचे सरकार चुकून स्थापन झाले. पंतप्रधान मोदींना जनादेश नाही. हे सरकार कधीही पडू शकते. देशाला मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी काम केले पाहिजे, परंतु आपल्या पंतप्रधानांची सवय आहे की ते काम नीट होऊ देत नाहीत.
तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष ‘मूर्खांच्या नंदनवनात’ जगत आहेत. केंद्रातील मोदी सरकार 3.0 कधीही पडणार नाही, असा दावाही अन्नामलाई यांनी केला.
यावेळेस 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला स्वबळावर बहुमत मिळालेले नाही. मात्र NDA आघाडीला पूर्ण बहुमत मिळाले आणि देशात पुन्हा मोदी सरकार स्थापन झाले. भाजपला सर्वाधिक 240 जागा मिळाल्या आहेत. तर एनडीए आघाडीसह हा आकडा 296 वर पोहोचला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App