मंत्री बनताच सिंधियांचे फेसबुक अकाउंट हॅक, जुने मोदी सरकारविरोधी व्हिडिओ अपलोड, पुन्हा रिकव्हरही झाले

Jyotiraditya scindhia FB Account Hacked Video Against Modi Government Uploaded by hacker

Jyotiraditya scindhia FB Account Hacked : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया मोदी मंत्रिमंडळात सामील झाले आहेत. परंतु त्यांन मंत्रिपदाचा पदभार घेताच त्यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्रमक भाषणाचा जुना व्हिडिओ कोणीतरी त्यांच्या फेसबुक वॉलवर दुपारी 12.23 वाजता अपलोड केल्याचे सांगण्यात येत आहे. यात ते मोदी सरकारच्या उणिवा सांगताना दिसत आहेत. सदरील व्हिडिओ सिंधिया कॉंग्रेसमध्ये असण्याच्या काळातील आहे. Jyotiraditya scindhia FB Account Hacked Video Against Modi Government Uploaded by hacker


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया मोदी मंत्रिमंडळात सामील झाले आहेत. परंतु त्यांन मंत्रिपदाचा पदभार घेताच त्यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्रमक भाषणाचा जुना व्हिडिओ कोणीतरी त्यांच्या फेसबुक वॉलवर दुपारी 12.23 वाजता अपलोड केल्याचे सांगण्यात येत आहे. यात ते मोदी सरकारच्या उणिवा सांगताना दिसत आहेत. सदरील व्हिडिओ सिंधिया कॉंग्रेसमध्ये असण्याच्या काळातील आहे.

ही बातमी पसरताच सायबर टीम सक्रिय झाली. हॅकिंग काही मिनिटांतच थांबविण्यात आल्याचा दावा केला जात आहे. यासह अपलोड केलेले व्हिडिओही काढून टाकण्यात आला आहे. परंतु, ग्वाल्हेर पोलिसांनी या प्रकरणाची माहिती नसल्याने त्यांनी घटना नाकारली आहे. परंतु भोपाळमधील सिंधिया समर्थक कृष्णा घाटगे यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

मार्च 2020 मध्ये कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये सामील झालेल्या सिंधिया यांचा बुधवारी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यांना कॅबिनेट मंत्री बनवताना नागरी विमान उड्डायन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते राज्यसभेचे खासदार आहेत.

खाते हॅक झाल्याने सर्व चकित

सिंधिया यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याच्या बातमीमुळे खळबळ उडाली. सायबर टीम क्षणोक्षणी खात्यावर लक्ष ठेवते. अशा परिस्थितीत हॅकिंगची माहिती मिळताच एक्स्पर्ट त्वरित अॅक्शन घेतली. काही मिनिटांतच हॅकिंग रोखण्यात आली. यानंतर अपलोड केलेले फोटो, व्हिडिओ हटविण्यात आले.

Jyotiraditya scindhia FB Account Hacked Video Against Modi Government Uploaded by hacker

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात