विधानसभा निवडणुकीच्या दीड महिना अगोदरच जननायक जनता पक्षाला हादरे बसत आहेत
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कैथलमधील जननायक जनता पक्षाचे नेते पालराम सैनी ( Palaram Saini ) यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते म्हणाले की, मी ‘JJP’ पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. आज मी पक्षाचा राजीनामा दिला आहे. माझ्या सहकारी नेत्यांनी माझ्यावर दबाव आणला. जेजेपीचे जिल्हाध्यक्ष रणदीप कौल यांनी निवडणुकीत पक्षाला आणि मला पाठिंबा दिला नाही. त्यांचे सहकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील पाऊल उचलले जाईल.
विधानसभा निवडणुकीच्या दीड महिना अगोदरच जननायक जनता पक्षात (जेजेपी) आमदारांच्या राजीनाम्याचे पेव फुटले आहे. उकलाना येथील आमदार अनूप धनक, टोहना येथील देवेंद्र बबली, गुहला चेका येथील आमदार ईश्वर सिंह आणि शाहबादमधील रामकरण काला यांनी राजीनामे दिले आहेत. त्यापैकी धनक आणि बबली हे भाजप-जेजेपी युती सरकारमध्ये पाच वर्षे मंत्री राहिले आहेत. जेजेपीचे दोन आमदार राम निवास सुरजाखेडा आणि जोगी राम सिहाग आधीच भाजपच्या संपर्कात आहेत.
पक्ष सोडल्यानंतर या चारही आमदारांनी कोणत्या पक्षात प्रवेश करणार याचा खुलासा केला नाही, मात्र तीन आमदार काँग्रेस आणि एक भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा आहे. या वर्षीच जेजेपीने भाजपपासून वेगळे होताच मोठ्या संकटाचा सामना केला. लोकसभा निवडणुकीपूर्वीच पक्षाच्या आमदारांनी बंडखोरी केली होती. या आमदारांनी पक्षाच्या बैठका आणि पत्रकार परिषदांना येणेही बंद केले होते. तेव्हापासून बंडखोर वृत्ती स्वीकारलेले हे आमदार कधीही पक्ष सोडू शकतात, अशी चर्चा आहे.
आमदार जोगी राम सिहाग आणि राम निवास यांनी उघडपणे भाजपला पाठिंबा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी उघडपणे भाजपच्या बाजूने प्रचार केला होता. या लोकांनी अद्याप पक्षाचा राजीनामा दिला नसला तरी पक्ष त्यांना कार्यक्रमांना निमंत्रित करत नाही. भाजप जेजेपीच्या दोन्ही बंडखोर आमदारांना तिकीट देऊ शकते, अशी चर्चा आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App