राज्ये, उद्योगांसह 1000 ITI, 5 NSTI अपग्रेड करण्यावर चर्चा सुरू असल्याचंही सांगितलं
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री जयंत चौधरी ( Jayant Chaudhary ) यांनी शुक्रवारी सांगितले की, 1,000 औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) आणि पाच राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था (NSTIs) आधुनिक करण्यासाठी सरकार राज्य सरकार आणि उद्योग संस्थांशी चर्चा करत आहे.
एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले चौधरी म्हणाले, “आम्ही राज्य सरकारांशी चर्चा करत आहोत आणि विविध उद्योग संघटनांशी सतत बोलत आहोत. 1,000 ITI आणि पाच NSTIs अपडेट करण्यासाठी आम्ही राज्यांकडून सूचना घेऊ कारण सुमारे 15,000 ITIs पैकी 12,000 खासगी क्षेत्रातील आहेत. आम्ही त्यांच्या मौल्यवान सूचनांचा समावेश करू इच्छितो
ते म्हणाले की, आयटीआय आणि एनएसटीआय अपग्रेड करण्यात महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावेल कारण राज्यात 4,100 आयटीआय आहेत, जे देशातील एकूण आयटीआय संस्थांच्या 10 टक्के आहे.
ते म्हणाले, “कौशल्य आकांक्षी बनवण्याची गरज आहे जेणेकरून रोजगारासाठी कौशल्य निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा सुविधा उपलब्ध करून देता येतील.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App