राजस्थानमध्ये निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, जाट नेत्या ज्योती मिर्धा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश

जाटबहुल भागात भाजपाचा हा मास्टरस्ट्रोक असल्याचे म्हटले जात आहे.

विशेष प्रतनिधी

जयपूर : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ जाट नेते नथुराम मिर्धा यांची नात आणि माजी काँग्रेस खासदार ज्योती मिर्धा आणि सवाई सिंह चौधरी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आज दिल्लीत राजस्थान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांच्या उपस्थितीत दोन्ही नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. Jat leader Jyoti Mirdha joins BJP a big blow to Congress before the elections in Rajasthan

दोन्ही नेत्यांचा जाट समाजात प्रभाव असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी दोन्ही नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. जाटबहुल भागात भाजपाचा हा मास्टरस्ट्रोक असल्याचे म्हटले जात आहे. या मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर आरएलपी प्रमुख हनुमान बेनिवाल यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

राजस्थानमध्ये या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीपूर्वीच राज्यात अशा राजकीय उलथापालथीनंतर राजकारण तापले आहे. किंबहुना मिर्धा घराणे गेली अनेक दशके काँग्रेसचे सहयोगी आहे. मात्र आता अचानक मिर्धा कुटुंबातील ज्योती मिर्धा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावरून राजस्थानच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.

Jat leader Jyoti Mirdha joins BJP a big blow to Congress before the elections in Rajasthan

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात