खासदार विजयसाई रेड्डी राजकारणातून निवृत्त, राज्यसभेतून राजीनामा देणार
विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : आंध्र प्रदेशच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या वायएस काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे खासदार विजयसाई रेड्डी यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचेही सांगितले. विजयसाई रेड्डी हे जगन मोहन रेड्डी यांचे जवळचे असल्याचेही म्हटले जाते.
वायएसआरसीपीचे खासदार विजयसाई रेड्डी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक लांब पोस्ट लिहून राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. विजयसाई रेड्डी यांनी इंस्टाग्रामवर लिहिले की, ‘मी राजकारणातून निवृत्त होत आहे. मी उद्या २५ जानेवारी २०२५ रोजी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देईन. मी कोणत्याही राजकीय पक्षात सामील होत नाहीये.
विजयसाई रेड्डी यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय वैयक्तिक असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की हे करण्यासाठी कोणीही त्यांच्यावर दबाव आणलेला नाही. विजयसाई रेड्डी एक्स वर पुढे लिहितात, ‘माझा राजीनामा कोणत्याही पदासाठी, नफ्यासाठी किंवा आर्थिक फायद्यासाठी नाही. हा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक आहे. माझ्यावर कोणताही दबाव, जबरदस्ती किंवा अनावश्यक प्रभाव नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App