तीन राज्यांमध्ये मुख्यमंत्री भाजपने निवडले बिबोभाट, जे. पी. नड्डांपाठोपाठ अमित शाहांनी देखील घेतला माध्यमांचा क्लास!!, असे म्हणायची पाळी गेल्या काही दिवसांतल्या राजकीय घडामोडींनी आणली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपने माध्यमांना “अनपेक्षित” वाटणारे यश मिळविले. त्या पाठोपाठ त्या राज्यांचे माध्यमांनी परस्पर “ठरविलेले” मुख्यमंत्री देखील बदलून टाकले. हे मुख्यमंत्री बदलताना माध्यमांच्या अपेक्षा नुसार भाजपमधून कुठलेही अस्वस्थतेचे, नाराजीचे अथवा बंडखोरीचे सूर आणि स्वर देखील उमटले नाहीत. अर्थातच माध्यमे पूर्णपणे चकली.J. P. Nadda and Amit Shah underlined media inability to understand the real BJP strategy of winning elections
एरवी आपण छापलेल्या बातम्यांमधून, टीव्हीवर दाखवलेल्या चेहऱ्यांमधून आपणच आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय ठरवत असतो, असे माध्यमेच स्वतःला भासवून घेत असतात. युपीए काळात ते सत्य देखील होते. हे निरा राडिया टेप्स वरून सिद्ध देखील झाले.
पण 2014 नंतर मात्र ही स्थिती पूर्ण बदलली आणि मुख्य प्रवाहातील माध्यमे म्हणजेच मेन स्ट्रीम मीडिया हळूहळू निष्प्रभावी होत गेला. आता ती एवढी निष्प्रभावी झाली आहेत की, माध्यमांचे भाजपच्या रिपोर्टिंगमधले कुठलेच अंदाज खरे ठरेनासे झाले आहेत. त्यांचे कुठलेच आकडे भाजपच्या राजकारणाशी मेळ खाईनासे झाले आहेत. माध्यमांना भाजप नेतृत्व विषयी कोणते अडाखेच बांधता येईनासे झाले आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपचे जेवढे म्हणून नेते माध्यमांनी मुख्यमंत्री पदाच्या रेस मध्ये आणले होते, त्यापैकी एकाही नेत्याला भाजपच्या हायकमांडने मुख्यमंत्री बनवले नाही. उपमुख्यमंत्रीही केले नाही. त्यामुळे काँग्रेस सह बाकीच्या विरोधकांबरोबरच मेन स्ट्रीम मीडिया देखील पूर्णपणे चकला. नव्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीनंतर या मुख्यमंत्र्यांची बॅकग्राऊंड कुठली??, हे चेक करण्याची वेळ माध्यमांना आली, ज्याचे अचूक आणि बिनचूक तपशील बिलकुलच माध्यमांकडे नव्हते.
त्यामुळे माध्यम प्रतिनिधींनी पूर्णपणे हार पत्करत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाच त्यामागचे खरे राजकीय इंगित उलगडायला सांगितले. आज तकच्या “अजेंडा” कार्यक्रमात हे घडले. आधी जे. पी. नड्डांची मुलाखत झाली आणि त्यानंतर अमित शाहांची मुलाखत झाली. या मुलाखतींमधूनच नड्डा आणि शाह या दोन्ही नेत्यांनी माध्यमांचा पुरता “क्लास” घेतला!!
माध्यमे आणि माध्यम प्रतिनिधी जो विचार करतात, जी आकडेवारी मांडतात, जी राजकीय – सामाजिक समीकरणे आणि गृहीतके मांडून आपले आडाखे निश्चित करतात, ते सगळे चुकीचे आहे. भाजपची राजकारण शैली बिलकुल तशी नाही, असे नड्डांनी राहुल कँवल नावाच्या अँकरला स्पष्ट सुनावले.
भाजपमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला “ऑब्जर्व्ह” केले जाते. डेटाचा प्रचंड अभ्यास केला जातो. त्याचे वेगवेगळे पैलू नि:पक्षपाती पणाने तपासले जातात. त्यासाठी विशिष्ट वेळ मोकळेपणाने दिला आणि घेतला जातो. कोणत्याही नेत्याच्या आसपास फिरणारे आणि फडकणारे नेते यांना बिलकुल महत्व दिले जात नाही. त्या उलट प्रत्यक्ष काम करणारा कार्यकर्ता आणि चमकोगिरी कार्य करणारा कार्यकर्ता यातला नेमका भेद ओळखून प्रत्येकाला काम दिले जाते. दिलेले काम हे “पद” नसून ती “जबाबदारी” असते आणि ती “जबाबदारी” हा अनिर्बंध अधिकार नसून “उत्तरदायित्व” असते, असे जे. पी. नड्डा यांनी स्पष्टपणे बजावले.
नेत्यांच्या आगे मागे फिरणाऱ्यांमुळे तिकीट मिळते, तिकीट मिळाले की निवडून येतो, हा भ्रम मनात बाळगू नका. याचा भाजपच्या तिकीट देण्याशी किंवा नाकारण्याशी काहीही संबंध नाही, हे त्यांनी हे सुनावून नड्डा मोकळे झाले.
भाजपमध्ये पक्षाध्यक्षांच्या कार्यालयातले गुड गव्हर्नन्स हे ऑफिस या सगळ्या गोष्टींवर नीट लक्ष ठेवते हे नड्डांनी सांगितले. तिथपर्यंत माध्यमांची पोहोच नाही, असे नड्डा बोलले नाहीत, पण ते त्यांनी सूचक पद्धतीने सांगितले.
– माध्यमांच्या तोकडेपणावर शाहांचे बोट
त्यापुढे जाऊन गृहमंत्री अमित शाह यांनी माध्यमांचा याच आज तकच्या “अजेंडा” कार्यक्रमात “क्लास” घेतला. माध्यमे जी भाषा वापरतात, जो अभ्यास करतात, जी आकडेवारी सांगतात किंवा तपासतात, तशी कुठलीही पद्धत आम्ही वापरत नाही. आमची स्वतंत्र पद्धत कार्यकर्त्याच्या आणि नेत्यांच्या अनुभवातून तयार झाली आहे. त्यातून फीडबॅक घेऊन त्याचा निश्चित स्वरूपात डेटा अनालिसिस करून स्वतंत्र कार्यशैली विकसित केली जाते आणि त्या कार्यशैलीवर आधारितच प्रत्येक निवडणूक स्वतंत्र आहे, असे गृहीत धरून आम्ही काम करतो, असे अमित शाहांनी राहुल कँवल यालाच ऐकवले.
इतकेच नाही तर भाजपमध्ये कोणी कद्दावर नेता नाही. सर्व सामान्य कार्यकर्त्यांमधून मोठे झालेले नेते आहेत. स्वतः नरेंद्र मोदी हेच कार्यकर्तांमधून म्हणून पुढे आले. त्या वेळच्या भाजपाच्या हायकमांडने त्यांना गुजरातचे मुख्यमंत्री बनवले होते, तोपर्यंत मोदींनी आमदारकीची निवडणूक सोडा, साधी सरपंच पदाची निवडणूक देखील लढवली नव्हती, पण नंतर त्यांचे नेतृत्व विकसित झाले. भाजपमध्ये नेतृत्व असेच विकसित होते. ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधूनच विकसित होते हे अमित शाहांनी अधोरेखित केले.
त्याचवेळी त्यांनी निवडणूक प्रणाली अधिकारांची रणनीतीकारांची भूमिका किती मर्यादित आहे हे देखील अधोरेखित करून टाकले. निवडणूक रणनीतीकार फक्त पक्षावरचा भार कमी करण्यासाठी असतात. निवडणूक जिंकून देण्यासाठी नसतात. जर नेतृत्वावर जनतेचा विश्वास असेल खाली कार्यकर्त्यांची फळी प्रत्यक्ष मैदानात असेल, तरच निवडणूका जिंकता येतात. निवडणूक रणनीतीकारांच्या आधारावर निवडणुका जिंकता येत नाहीत, असे परखड बोल अमित शाहांनी ऐकवले.
जे. पी नड्डा आणि अमित शाह यांनी या निमित्ताने अप्रत्यक्षपणे “माध्यमांचे निवडणूक निकष” आणि “भाजपचे निवडणूक निकष” यातला मूलभूत भेदच सांगितला. भाजपची नेमकी रणनीती समजून घेण्यात माध्यमे कमी पडतात. माध्यमांचे भाजपच्या अंतर्गत वर्तुळात बिलकुलच कुठलेही “सोर्सेस” नाहीत. हेच त्यांनी सूचित केले. माध्यमांची रिपोर्टिंग स्टाईल आणि ॲनालिसिस स्टाईल ही जुनी काँग्रेसी गटतटांची आणि जुन्या सामाजिक विभाजनाच्या भाषेची आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या या दोन्ही नेत्यांनी माध्यमांच्या घेतलेल्या क्लास मधले हे खरे “बिटवीन द लाईन्स” आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App