पुण्याचे माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी यांनी केला आहे आरोप
विशेष प्रतिनिधी
Bitcoin महाराष्ट्रातील निवडणुकीच्या एक दिवस आधी पुण्याचे माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी राष्ट्रवादी-सपा नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर मोठा आरोप केला आहे.Bitcoin
2018 च्या क्रिप्टोकरन्सी फसवणूक प्रकरणात दोन्ही नेत्यांनी बिटकॉइनचा गैरवापर केला आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निधी देण्यासाठी वापरल्याचा आरोप माजी IPS अधिकाऱ्याने केला. तपासाला पाठिंबा देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून जाब विचारला आहे.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी बिटकॉइन व्यवहाराबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याकडून उत्तर मागितले आहे. सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषदेमध्ये एक कथित व्हिडिओ ऑडिओ क्लिप दाखवली, ज्यामध्ये NCP-SCP खासदार सुप्रिया सुळे यांचा आवाज ऐकू येतो, “Bitcoin च्या बदल्यात रोख रक्कम हवी आहे. तुम्हाला कोणत्याही चौकशीची काळजी करण्याची गरज नाही; सत्तेत आल्यानंतर आम्ही ते हाताळू.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App