विशेष प्रतिनिधी
दिल्ली : क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यातून चोरी केलेल्या पैशातून महाविकास आघाडी निवडणूक लढवित असल्याचा आरोप माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी केल्याचे वृत्त बखर लाईव्हने दिले होते. बखर लाईव्हच्या वृत्ताची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी यावर महाविकास आघाडीला पाच प्रश्न विचारले आहेत. भ्रष्टाचाराच्या पैशातून महाविकास आघाडीचा निवडणूक खर्च करत आहे का, असा सवाल त्यांनी केला आहे. Five questions from BJP national spokesperson on cryptocurrency scam
सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचा बिटकॉईन घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी केला आहे. यावरून भाजपने महाविकास आघाडीवर टीका करत सवाल उपस्थित केला आहे. सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचा बिटकॉईन घोटाळ्यात सहभाग आहे की नाही, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे आवाहन भाजचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केले.
बिटकॉइनच्या माध्यमातून निवडणुकीला निधी दिला जात असल्याचा आरोप माजी आयपीएस रवींद्रनाथ पाटील यांनी केला. यामध्ये बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.
G-20 summit : G-20 शिखर परिषदेत मोदी म्हणाले – ‘ग्लोबल साउथचा आवाज बुलंद करावा लागेल’
भाजपचे काँग्रेसला पाच प्रश्न
१. या ऑडिओ क्लिपमध्ये बिटकॉईनबाबत करण्यात आलेल्या दाव्यांमध्ये काँग्रेस नेते नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांचा समावेश आहे की नाही?तो कायदेशीर व्यवहार आहे की बेकायदेशीर?
२. तुमचा गौरव मेहता आणि गुप्ता नावाच्या व्यक्तीशी काही संबंध आहे की नाही?कधी संपर्क झाला की नाही?
३. अशाप्रकारचा कोणता संवाद गौरव मेहता किंवा गुप्ता नावाच्या व्यक्तीशी झाला की नाही?
४. नुसते ट्विट करून फायदा होणार नाही. हा तुमचा आवाज आहे की नाही हे तुम्हाला सांगावे लागेल.
५. यात बिग पीपल हा शब्द बोलला जात आहे, ती मोठी माणसे कोण आहेत?
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App