विशेष प्रतिनिधी
पुणे : Amitabh Gupta पुण्यातील कथित क्रिप्टो फसवणूक प्रकरणात पुणे पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलेल्या माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणातील साक्षीदार गौरव मेहता याला तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बिटकॉइनचे पैसे कॅश क रून दीडशे कोटी रुपये दुबईला पोहोचवण्यास सांगितले. गौरव मेहता ऐकत नसल्याने सुप्रिया सुळे यांनी त्याला दम दिला. या संभाषणाची ऑडिओ क्लिप बखर लाईव्हच्या हाती लागली आहे. Amitabh Gupta
माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी याबाबतची क्लिप समोर आणली आहे. या क्लीपमध्ये अमिताभ गुप्ता गौरव मेहताला म्हणतात, आपल्याला पुढील आठवड्यात 50 कोटी रुपये हवेत. ही रक्कम दुबईतील एकाकडे पोहोचवायची आहे. तुझ्या मित्राला कॅश तयार ठेवायला सांग. अमिताभ गुप्ता नंतर म्हणतात, गौरव आणखी शंभर कोटी रुपये तयार ठेव. ते देखील दुबईत पोहोचवायचे आहेत. काही महत्वाचे इव्हेंट होणार आहेत. Amitabh Gupta
अमिताभ गुप्ता यांच्या सांगण्याला गौरव मेहता यांनी कदाचित प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी गौरव मेहताला दम दिला असा दावा रवींद्रनाथ पाटील यांनी केला. या ऑडिओ क्लिप मध्ये सुप्रिया सुळे म्हणताना ऐकू आहेत की, गौरव तू आम्हाला रिस्पॉन्स का देत नाही. आम्हाला कॅश पाहिजे आहे. Amitabh Gupta
पाटील यांनी सांगितले की, “२०१८ मध्ये माझ्या कंपनीने मला क्रिप्टोकरन्सी तज्ञ म्हणून एका प्रकरणाच्या चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, २०२२ मध्ये मला त्या प्रकरणात फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. मी १४ महिने तुरुंगात होतो. त्या काळात मी विचार करत होतो की नक्की काय घडले आणि मला का अडकवले गेले. माझ्या इतर सहकाऱ्यांसोबत आम्ही सत्य शोधण्याचा प्रयत्न करत होतो.”
पाटील पुढे म्हणाले की, “आमच्याविरुद्ध साक्ष देणाऱ्या गौरव मेहताने दोन दिवसांपूर्वी मला वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. शेवटी मी फोन घेतला तेव्हा त्याने २०१८ मधील अमित भारद्वाजच्या अटकेचा उल्लेख केला. त्यावेळी अमितच्या ताब्यात असलेले क्रिप्टोकरन्सी हार्डवेअर वॉलेट बदलण्यात आले होते. हे काम तत्कालीन आयुक्त अमिताभ गुप्ता आणि त्यांच्या पथकाने केले, असा मेहताचा दावा आहे.
रवींद्रनाथ पाटील यांनी सांगितले की, “आम्हाला अटक झाली, पण खरे गुन्हेगार अमिताभ गुप्ता आणि भाग्यश्री नवटक्के हे होते. गौरव मेहताने दावा केला की या बिटकॉइनच्या पैशांचा वापर महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत झाला.
या आरोपांमुळे आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App