गाझा पट्टीत पुन्हा एकदा इस्रायलचा प्राणघातक हल्ला, 71 जणांचा मृत्यू !

मोठ्या संख्येने लोक जखमी, गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने अधिकृत निवेदनात ही माहिती दिली


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या नऊ महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. इस्रायलने हमासचा खात्मा करण्याची ठाम प्रतिज्ञा केली आहे. ही प्रतिज्ञा गाझा पट्टीतील लोकांवर खूप प्रभाव करत आहे. गाझामध्ये इस्रायलची लष्करी कारवाई सुरूच आहे.Israel once again launches deadly attack on Gaza Strip 71 people killed

दरम्यान, इस्रायलने गाझा पट्टीवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला केल्याचे वृत्त समोर आले आहे. या हल्ल्यात 71 जणांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने अधिकृत निवेदनात ही माहिती दिली आहे.



दुसरीकडे, इस्रायली अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांनी हमासच्या लष्करी तुकडीच्या प्रमुखाला लक्ष्य केले होते. इस्रायलने गाझा पट्टीतील खान युनिस भागात हा हल्ला केला आहे. इस्त्रायली अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी मोहम्मद दाईफच्या ठाण्यांवर हवाई हल्ले केले आहेत.

मोहम्मद दाईफ हा ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड मानला जातो. ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलमध्ये कहर केला होता. त्या काळात १२०० लोक मारले गेले. त्यामुळे इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू झाले.

Israel once again launches deadly attack on Gaza Strip 71 people killed

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात