वृत्तसंस्था
बंगळुरू : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयिताची ओळख पटवली आहे. मुसावीर हुसेन शाजीब असे आरोपीचे नाव आहे. तो कर्नाटकातील तीर्थहल्ली जिल्ह्यातील शिवमोग्गा येथील रहिवासी आहे.ISIS terrorist accused in Bangalore’s Rameswaram cafe blast; He was identified as Hussain Shajib
तपास यंत्रणेने शाजीबच्या आणखी एका साथीदाराची ओळख पटवली आहे. अब्दुल मतीन ताहा असे त्याचे नाव आहे. ताहा हा तामिळनाडूचे पोलीस निरीक्षक के विल्सन यांच्या हत्येप्रकरणी हवा होता आणि तो मुख्य संशयित आरोपीसोबत चेन्नईत राहत होता.
एनआयएच्या म्हणण्यानुसार, शाजीब आणि ताहा दोघेही आयएसआयएस मॉड्यूलचा भाग होते. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या मॉड्यूलच्या सदस्यांनीही याची पुष्टी केली होती.
एनआयएने कॅपच्या मदतीने संशयिताची ओळख पटवली
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएने परिसरातील 1,000 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून आरोपींचा शोध घेतला. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या म्हणण्यानुसार, ताहा नेहमी ट्रिपलिकेनमध्ये राहताना खरेदी केलेली टोपी घालत असे. स्फोटाच्या दिवशी संशयित हल्लेखोर शाजीबने हीच टोपी घातलेली दिसली होती. या टोपीच्या केवळ 400 नगांचीच विक्री झाल्याचे तपासणीत आढळून आले.
दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एनआयए अधिकाऱ्यांना ताहा चेन्नईतील एका मॉलमधून कॅप खरेदी करताना आढळला. स्फोटानंतर संशयिताने कॅफेपासून काही अंतरावर कॅप टाकली.
तपासणी केली असता जानेवारीच्या अखेरीस मॉलमधून कॅप खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. एनआयएच्या सूत्रांनी असेही सांगितले की त्यांना टोपीमध्ये केस सापडले होते, जे फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात आले होते. अहवालात मुख्य संशयित शाजिबच्या पालकांच्या डीएनए नमुन्यांशी ते जुळले होते.
नंतर, शाजिबच्या पालकांनी त्याचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले आणि दिसलेली व्यक्ती त्यांचा मुलगा असल्याची पुष्टी केली. एजन्सीने असेही म्हटले आहे की संशयिताला शेवटचे नेल्लोर, आंध्र प्रदेश येथे पाहिले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App