पंतप्रधान मोदींनी मॉस्को दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध, रशियाला सहकार्याचे दिले आश्वासन


रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे ISIS या दहशतवादी संघटनेचा हात आहे PM Modi condemns Moscow terror attack promises cooperation to Russia

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाची राजधानी मॉस्को येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असून, मृत लोकांप्रती शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, आम्ही मॉस्कोमधील घृणास्पद दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. या दुःखाच्या प्रसंगी भारत रशियन फेडरेशनच्या सरकार आणि लोकांच्या पाठीशी उभा आहे.

मॉस्कोजवळील क्रोकस सिटी हॉलमध्ये एका मैफिलीच्या कार्यक्रमात वेश बदलून आलेल्या पाच बंदूकधाऱ्यांनी स्वयंचलित शस्त्रांनी गोळीबार केला. इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान 60 जणांचा मृत्यू झाला असून 145 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे ISIS या दहशतवादी संघटनेचा हात आहे. खुद्द इसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ISIS च्या न्यूज एजन्सी अमाकने टेलिग्रामवर मॉस्को दहशतवादी हल्ल्याशी संबंधित एक स्टेटमेंट जारी केले आहे. या निवेदनात त्यांनी क्रोकस सिटी हॉलमध्ये झालेल्या शूटिंगची जबाबदारी स्वीकारली आहे.

आयएसआयएसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असली तरी, या हल्ल्याशी संबंधित कोणताही पुरावा त्यांनी उघड केलेला नाही. ISIS ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की त्यांनी मॉस्कोच्या क्रॅस्नोगोर्स्क शहरातील ख्रिश्चनांच्या एका मोठ्या कार्यक्रमावर हल्ला केला आहे, ज्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.

PM Modi condemns Moscow terror attack promises cooperation to Russia

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात