विशेष प्रतिनिधी
मुंबई : कट्टरतेसाठी दहशतवाद पसरवणाऱ्या इसिस या दहशतवादी संघटनेचे जाळे छत्रपती संभाजीनगरातही पसरले असल्याचे स्पष्ट झाले आहे. किमान 50 तरुण इसिसच्या संपर्कात आहेत. 15 फेब्रुवारी 2024 रोजी शहरातील हर्सूल परिसरातील बेरीबाग परिसरातून एनआयएने मोहंमद जोएब खानला (३५) अटक केली होती. त्याच्याविरुद्ध शुक्रवारी मुंबईतील एनआयएच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यात संभाजीनगरातून सुरू असलेल्या इसिसच्या कारवायांची ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.ISIS network in Chhatrapati Sambhajinagar; 50 youth trapped through social media, NIA chargesheet reveals
लिबियातून जगभरात इसिसचे जाळे पसरवणारा मोहंमद शोएब खानने आयटी इंजिनिअर असलेल्या जोएबची भरती केली होती. जोएब त्याच्यासाठी स्लिपरसेल म्हणून काम करत होता. देशातील संवेदनशील ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी जोएबच्या मदतीने शोएबने माथेफिरू तरुणांची टोळी तयार केली होती. भारतात मोठ्या घातपाती कारवाया करून अफगाणिस्तान किंवा तुर्कियेत पळून जाण्याचा कट रचण्यात आला होता. लिबियाचा शोएब आणि छत्रपती संभाजीनगरातील जोएब त्या कटाचा मुख्य सूत्रधार होता, असे या दोषारोपपत्रात म्हटले आहे.
जोएबचा भाऊही आयटी अभियंता, लिबियात नोकरीला
जोएब हा सामान्य कुटुंबातील आहे. फेब्रुवारी महिन्यात एनआयएने जोएबला अटक करत शहरात नऊ ठिकाणी छापे मारले होते. तो विवाहित असून त्याला दोन मुली आहेत. त्याचे वडील निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. जोएब बंगळुरूमध्ये नोकरी करतो. अलीकडे वर्क फ्रॉम होम असल्याचे सांगत घरून काम करत होता. त्याचे दोन भाऊ आखाती देशात नोकरी करतात. त्यातील एक आयटी इंजिनिअर असून तो इसिसचे मोठे नेटवर्क असलेल्या लिबियातील एका कंपनीत काम करतो.
व्हॉटस्अॅप ग्रुपवर चॅटिंग
मोहंमद शोएब खान याने भरती केलेल्या मोहंमद जोएब खान याने व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपमध्ये जोएबने शहरातील 50 तरुणांना सहभागी केले. या ग्रुपवर अनेक ठिकाणी मोठ्या हल्ल्यासाठी स्फोटकांची निर्मिती आणि आयईडी बनवण्याचे व्हिडिओ टाकले जात होते. त्यांनी कारवाईचा पूर्ण प्लॅनही तयार केला होता, असे दोषारोपपत्रात म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App