हरीश फारुकीसोबत पोलिसांनी त्याच्या एका साथीदारालाही अटक केली आहे
विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : आसाम पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सला (एसटीएफ) बुधवारी मोठे यश मिळाले. दहशतवादी संघटना ISIS चा भारत प्रमुख हरीश फारुकी याला पोलिसांनी धुबरी येथून अटक केली आहे. हरीश फारुकीसोबत पोलिसांनी त्याच्या एका साथीदारालाही अटक केली आहे. रेहान असे अटक करण्यात आलेल्या साथीदाराचे नाव आहे. ISIS India chief Harish Farooqui arrested Assam police nabbed from Dhubri
एसटीएफच्या सूत्रांनी एनडीटीव्हीला सांगितले की सुरक्षा यंत्रणांना माहिती मिळाली होती की ISIS चे दोन सदस्य बांगलादेश सीमेवरून भारतात घुसून काही मोठी घटना घडवू शकतात. या दोघांना अटक करण्यासाठी पोलिस महानिरीक्षक पार्थसारथी महंत यांच्या नेतृत्वाखाली एसटीएफचे पथक मंगळवारी सायंकाळीच बाहेर पडले होते.
माहितीच्या आधारे भारत आणि बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळील परिसरात शोध सुरू करण्यात आला. सीमा ओलांडल्यानंतर धुबरीच्या धर्मशाला परिसरात पहाटे पथकाने दहशतवाद्यांना यशस्वीरित्या अटक केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App