विशेष प्रतिनिधी
केरळ : कोरोनासारख्या जागतिक साथीचा मुकाबला करताना तो कठोरपणे व तटस्थपणे करावा लागतो. त्याकडे राजकारणाच्या, धर्माच्या चष्म्यातून पाहणे सर्वथा चुकीचे असते. अन्यथा त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात. देशात धर्मनिरपेक्षतेचे केवळ आपणच रखवाले असल्याच्या थाटात वावरणाऱ्या केरळच्या पिनारायी विजयन सरकारने नेमकी हीच चूक केली आहे. केवळ मतांवर डोळा ठेवत राज्य सरकारने कोरोनाच्या काळातही मुस्लीमांचे तुष्टीकरण करण्यात धन्यता मानली आणि आता त्याचे परिणाम साऱ्या राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागत आहेत. Is World acclaimed so called Kerala model is failing? Statistics don’t lies
(सौजन्य : इंडिया टुडे)
राज्यातील मुस्लीम मतदारांना खूष करण्यासाठी सरकारने बकरी ईदच्या काळात तीन दिवस कोरोनाचे नियम शिथील केले. त्यामुळे सर्व राज्यात गर्दीचा महापूर झाला. ईद जल्लोषात साजरी झाली खरी. पण त्याची गंभीर परिणाम आता सर्वत्र दिसू लागले आहेत. राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत आता कमालीची वाढ होवू लागली आहे. त्यामुळे देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला केरळमधूनच पाय फुटतात की काय अशी भिती वर्तविली जात आहे.
केरळमध्ये सातत्याने रूग्णवाढ होत असतानाही डाव्या आघाडीचे मुख्यमंत्री विजयन यांनी ईद साजरी करण्यासाठी राज्यात तीन दिवसांसाठी करोनाविषयक निर्बंधांमधून सूट देण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील व्यापाऱ्यांच्या दबावाखाली येऊन सूट दिल्याचे सरकारने न्यायालयास सांगितले होते. मात्र यामागे खरे कारण व्यापाऱ्यांचे हित नाही तर केवळ मतांचे राजकारणच असल्याचे मानले जाते. केरळमध्ये मुस्लीमांचे तुष्टीकरण्याची एकही संधी डावी आघाडी त्याचप्रमाणे कॉंग्रेस सोडत नाही. त्यातूनच आता राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्देक होवू लागला आहे.
मुस्लिमांना खूश करण्याच्या नादात केरळच्या डाव्या सरकारने बकरी ईदसाठी तीन दिवस कोरोनाचे नियम शिथिल केले. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने फटकारे ओढल्यानंतर विजयन सरकार जरा नरमले.
कुंभमेळ्याला परवानगी दिल्याने उत्तर भारतात कोरोनाची साथ बळावल्याचा आरोप करणाऱ्या डाव्या पक्षांचे खरे रूप यानिमित्ताने समोर आले आहे. कोरोनामुळे सध्या देशात सर्वच धार्मिक उत्सवांवर बंदी आहे. त्याला कोणतीच यात्रा किंवा उत्सव अपवाद नाही. कोरोनामुळे यावर्षी पुरीतील जगप्रसिद्ध जगन्नाथ यात्रा रद्द करण्यात आली. उत्तर भारतात प्रसिद्ध असलेली कावड यात्राही रद्द झाली. महाराष्ट्रात देखील लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आषाढी यात्रेवर तसेच विविध संतांच्या पायी पालखी सोहळ्यांना परवानगी नाकारण्यात आली. या सर्वच ठिकाणी हिंदू समाजाच्या तसेच व्यापाऱ्यांचा त्या त्या राज्यातील सरकारांवर दबाव होताच. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने यात्रा होवू देण्याची त्यांची मागणी होती. पण वैज्ञानिक तज्ञांचा सल्ला घेत त्या त्या राज्यातील सरकारांनी हा दबाव झुगारत यात्रांना परवानगी नाकारली. त्यामुळे आजही या राज्यात कोरोना आटोक्यात आहे. याच्या उलट केवळ केरळमध्येच रुग्णसंख्येचा आलेख वाढत आहे.
देशात मंगळवारी कोरोनाचे ४३ हजार ६५४ नवे रुग्ण आढळले, त्यापैकी तब्बल २२ हजार १२९ म्हणजेच ५० टक्क्यांहून अधिक रूग्ण हे एकट्या केरळ राज्यातील आहेत. हे आकडेच पुरेसे बोलके आहेत. यामागे ईदला दिलली सूटच कारणीभूत असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त करूनही सरकारने त्याकडे डोळेझाक केली होती. त्यामुळे देशात तिसऱ्या लाटेची सुरूवात केरळमधून होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाच्या लाटेत देखील बकरी ईद सारख्या सणांना सवलती देण्याचा हा परिणाम असल्याचे स्पष्ट होत आहे.
गेल्या ५१ दिवसात प्रथमच एखाद्या राज्यात २० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. केरळपाठोपाठ महाराष्ट्रात ६२५८, कर्नाटकात १५०१ रुग्ण आढळले आहे. पहिल्या व दुसऱ्या क्रमांकातील तफावत पाहिली तरी केरळची रुग्णसंख्या धडकी भरावी अशीच आहे.
कोरोना व्यवस्थापनामध्ये केरळ राज्याने अभुतपूर्व कामगिरी केल्याचा डांगोरा पिटला जात होता. मात्र त्यांचा हा दावा किती हास्यास्प आहे हे आता स्पष्ट होवू लागले आहे. ज्या उत्तर प्रदेशात कोरोनाची व्यवस्थापन योग्य झाले नाही अशी टीका डावे पक्ष व कॉंग्रेसने सातत्याने केली तेथे मंगळवारी अवघे १८ रुग्ण सापडले आहेत. एकप्रकारे यामुळे या पक्षांचे वाभाडेच निघाले आहेत. उत्तर प्रदेशातील योगी सरकारने ज्या धडाकेबाजपणे चाचण्यांची संख्या वाढविल्या, लसीकरणाचा वेग वाढविला त्याचे दृश्य परिणाम आता दिसू लागले आहेत. पहिल्या लाटेत उत्तम कामगिरी केल्याच्या डंका पिटणाऱ्या केरळच्या डाव्या सरकारने मुस्लीम मतदारांना खूष करण्यासाठी साऱ्या देशाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App