छत्तीसगडचे आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्री आमने-सामने, मुख्यमंत्रीपदाबाबत बदलाच्या चर्चेनंतर कॉँग्रेस आमदाराकडूनच आरोग्य मंत्र्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप


विशेष प्रतिनिधी

रायपूर : छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदाची अदलाबदल करण्याची चर्चा सुरू झाल्याने कॉँग्रेसमध्ये वादंग निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री भुपेश बघेल आणि आरोग्य मंत्री टी.एस. सिंह देव आमने-सामने आले आहेत.Chhattisgarh Health Minister and CM face-to-face, Congress MLA accused Health Minister attempting to assassinate

एका कॉँग्रसे आमदाराच्याच खुनाचा प्रयत्न कल्याचा आरोप देव यांच्यावर झाल्याने त्यांनी विधानसभेवर बहिष्कार टाकला होता. मात्र, पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावल्यावर देव यांनी प्रश्न सुटला असल्याचे म्हणत सारवासारव केली आहे.छत्तीसगडचे कॉँग्रेस आमदार बृहस्पती सिंह यांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. बघेल हेच मुख्यमंत्रीपदी राहावेत असे मत वक्तव्य केल्याने आपल्यावर हल्ला झाल्याचे बृहस्पती सिंह यांनी म्हटले होते. देव यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

त्यामुळे विधानसभेतही त्यावरून गोंधळ झाला होता. जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही किंवा सरकार आपल्या बाजुने वक्तव्य करत नाही तोपर्यंत आपण विधानसभेत येणार नाही म्हणत देव यांनी बहिष्कार घातला होता.

आपली प्रतिमा खराब करण्यासाठी हे आरोप केले गेले आहेत, असे देव यांचे म्हणणे आहे.छत्तीसगड कॉँग्रेसचे प्रभारी पी. एल. पुनिया यांनी सिंग यांनाही नोटीस बजावली असून त्यांच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. त्यानंतर देव यांनी सांगितले की आता हा विषय निकाली निघाला आहे.

Chhattisgarh Health Minister and CM face-to-face, Congress MLA accused Health Minister attempting to assassinate

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*